साव:या दिगर येथे बालिकेवर युवकाचा अत्याचार

By Admin | Updated: May 30, 2017 17:42 IST2017-05-30T17:42:32+5:302017-05-30T17:42:32+5:30

युवकाने 12 वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना साव:या दिगर, ता.धडगाव येथे 15 मे रोजी घडली.

Sav: Tevika's atrocities on the boy at Digar | साव:या दिगर येथे बालिकेवर युवकाचा अत्याचार

साव:या दिगर येथे बालिकेवर युवकाचा अत्याचार

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.30 - ठार मारण्याची धमकी देत युवकाने 12 वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना साव:या दिगर, ता.धडगाव येथे 15 मे रोजी घडली. याप्रकरणी बालिकेच्या फिर्यादीवरून युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगाना, ता.धडगाव येथील 12 वर्षीय बालिका साव:या दिगर येथील नानत्या गण्या पावरा यांच्या घरी गेली होती. ती घरात एकटी होती. ती संधी नानत्या गण्या पावरा याने घरात घुसून बालिकेस दमदाटी केली. तिला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. 
या घटनेनंतर बालिका घाबरली होती. तिने 29 मे रोजी याबाबत आई-वडिलांना ही बाब सांगितली. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे ठरविण्यात आले. बालिकेच्या फिर्यादीवरून नानत्या गण्या पावरा याच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Sav: Tevika's atrocities on the boy at Digar