शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

वनपट्टेधारकांच्या मागण्यांची पूर्तता करून सातबारा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST

निवेदनात म्हटले आहे की, जिल्हास्तरीय वनहक्क समितीने मान्य केलेल्या वनहक्क वनपट्टेधारकांना सातबारा उतारा देण्यात यावा, अनुसूचित जमाती व इतर ...

निवेदनात म्हटले आहे की, जिल्हास्तरीय वनहक्क समितीने मान्य केलेल्या वनहक्क वनपट्टेधारकांना सातबारा उतारा देण्यात यावा, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनहक्काची मान्यता अधिनियम २००६ व नियम २००८ अन्वये वैयक्तिक वनहक्क धारकांना त्यास प्राप्त झालेल्या वनपट्ट्याच्या आधारावर बँकांनी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, पुनर्रपडताळणी प्रपत्र १२ नुसार वैयक्तिक वनहक्क दावेदाराची वनपाल, तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक, वनहक्क समितीचे अध्यक्ष, सचिव यांनी सदर पळताळणी दिवशी सूचविलेल्या शिफारशीच्या आधारावर दावे मंजूर करण्यात यावे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत तालुक्यातील सर्व वनहक्क पात्र दावेदारांना योजना लागू करून सुटलेल्या लाभार्थ्यांची पुन्हा नोंदणी करून योजनेचा लाभ देण्यात यावा, तालुक्यातील वैयक्तिक वनहक्क धारकांचे प्रलंबित असलेले प्रस्ताव जलदगतीने निकाली काढून वनपट्टे देण्यात यावे, तालुक्यातील वैयक्तिक वनहक्क धारकांचे जीपीएस मोजणी बाकी असलेले दावेदार यांची जीपीएस मोजणी करून तत्काळ नकाशे करून देण्यात यावे, वनपट्टेधारकांना सिंचनासाठी वीज कनेक्शन जोडून पाण्याची सोय करावी, सन १९८० पासून २००५ पूर्वी व आजतागायत ज्या अतिक्रमणधारकांनी प्रपत्र १२ अ प्रमाणे दावे दाखल केले आहे, असे सर्व दावे पात्र करण्यात यावे, दावेदाराच्या दावा केलेल्या वनजमिनीवर १३ डिसेंबर २००५ पूर्वीपासून दावा आहे किंवा त्यानंतर १३ डिसेंबर नंतरचा ताबा असल्यास कोणत्या वर्षापासून आहे याबाबत अभिप्राय देण्यात यावा, अशा वनपट्टेधारकांच्या विविध मागण्यांची पूर्तता लवकर करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनावरद्वारे केली आहे. निवेदनावर भाजप अनुसूचित जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, राजमोईचे सरपंच जयमल पाडवी, रमेश नाईक, अशोक पाडवी, विजय वसावे, भूपेंद्र पाडवी, अलिविहीरचे सरपंच किसन नाईक, चेतन वसावे, भूषण पाडवी यांनी केली आहे.