शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

गटविकास अधिकारी त्रास देत असल्याचा सरपंचाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST

दप्तर दिले नाही म्हणून सूचना केली होती.. दरम्यान, याबाबत गटविकास अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी यांना संपर्क केला असता, सरपंच व ...

दप्तर दिले नाही म्हणून सूचना केली होती..

दरम्यान, याबाबत गटविकास अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी यांना संपर्क केला असता, सरपंच व उपसरपंच यांचे आरोप खोटे असल्याचे त्यांनी सांगितले. अक्कलकुवा ग्रामपंचायतीवर सध्या ग्रामसेवक नाही. नवीन ग्रामसेवक नियुक्त करून पाठविल्यानंतर त्यांना दप्तर देण्याची कार्यवाही केली गेली नाही. सरपंच राजेश्वरी वळवी यांनी दप्तर ताब्यात ठेवून घेतले आहे. ग्रामसेविकेचे दप्तर ताब्यात ठेवणे बेकायदेशीर आहे. यातून त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना केल्यावर त्यांच्याकडून वादावादी करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला.

अक्कलकुवा पंचायत समितीत वादावादी

गेल्या अनेक महिन्यांपासून अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील विविध प्रकरणे गाजत आहेत. गेल्या आठवड्यापासून लोकप्रतिनिधींच्या निधीतून गटारींचे बोगस बिल काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत होता. या प्रकरणात राजकीय हेव्यादाव्यातून पूर्ण केलेल्या कामांचा निधी ठेेकेदाराला मिळू नये, यासाठी १३ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीकडून घेण्यास नकार दिल्याची माहिती आहे. यातील काही निधी परत जाण्याची वेळ येऊन झालेल्या कामाची रक्कम ठेकेदाराला मिळू नये, यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीराम नगरातील गटारीचे काम पूर्ण होऊन त्याचा निधी वितरण करण्यास ग्रामपंचायतीने नकार दिल्याचे यातून स्पष्ट होत आहे.