सॅनिटायङोशन व्हॅन ठरली पोलिसांसाठी आरोग्यदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 12:35 IST2020-04-11T12:35:29+5:302020-04-11T12:35:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बंदोबस्तावरील कर्मचा:यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी यासाठी जिल्हा पोलीस दलाने सॅनिटायङोशनची दोन व्हॅन तयार ...

Sanitizing van becomes police ambassador | सॅनिटायङोशन व्हॅन ठरली पोलिसांसाठी आरोग्यदूत

सॅनिटायङोशन व्हॅन ठरली पोलिसांसाठी आरोग्यदूत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बंदोबस्तावरील कर्मचा:यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी यासाठी जिल्हा पोलीस दलाने सॅनिटायङोशनची दोन व्हॅन तयार केल्या आहेत. या व्हॅनद्वारे बंदोबस्तावरील पोलीस कर्मचा:यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या इतर कर्मचा:यांचे सॅनिटायङोशन केले जात आहे. यामुळे कर्मचा:यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होत आहे. 
तपासणी नाके, चौक, रस्ते आणि नेमून दिलेल्या पॉईंटवरील कर्मचा:यांना त्यांच्या डय़ुटीच्या काळात विविध लोकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा कर्मचा:यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस दलातील दोन व्हॅनमध्ये सॅनिटायङोशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. व्हॅनच्या आत स्प्रिंक्लरद्वारे निज्रूतुकीकरणाची फवारणीची सोय आहे. 
कर्मचारी व्हॅनच्या आत एक अर्धा ते एक मिनिटासाठी जातो. त्याच्यावर त्याद्वारे फवारणी होत असते. 24 तास या दोन्ही व्हॅन तपासणी नाके आणि बंदोबस्तावरील पॉईंटच्या ठिकाणी फिरत असतात. 
या व्हॅन तयार करण्यासाठी पोलीस दलातीलच कर्मचा:यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. कर्मचा:यांच्या डय़ुटीच्या सक्तीप्रमाणे त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जावी यासाठी पोलीस दल सज्ज आहे. त्याच भुमिकेतून या दोन्ही व्हॅनची निर्मिती करण्यात आली    आहे.
याशिवाय पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिकठिकाणी हॅण्डवॉश स्टेशन देखील तयार करण्यात आले आहेत. तेथे सॅनिटायझर आणि पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. कर्तव्यावरील कर्मचारी आणि कामे घेवून येणा:या कर्मचा:यांना या ठिकाणी हात धुण्याची सोय करण्यात आली     आहे. 

Web Title: Sanitizing van becomes police ambassador