शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शहादा येथे टाकाऊ वस्तूंपासून सॅनिटायझर तंबू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील कुलकर्णी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी टाकाऊ वस्तंूपासून रूग्णालयात येणाºया रुग्णांसाठी तसेच कर्मचारी व डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील कुलकर्णी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी टाकाऊ वस्तंूपासून रूग्णालयात येणाºया रुग्णांसाठी तसेच कर्मचारी व डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर तंबू तयार केला आहे.शहरातील कुलकर्णी रूग्णालयात रोज सुमारे ४०-५० रुग्ण तपासणी व शस्त्रक्रियेसाठी येतात. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बाहेरून आलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांमुळे रुग्णालयातील इतर रूग्णांना, रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना तसेच डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सॅनेटायझर तंबू लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा सॅनेटायझर तंबू रूग्णालयातील कर्मचाºयांनी टाकाऊ वस्तूपासून तयार केला आहे. फिटींगचे टाकाऊ पाईप, प्लास्टिक कागद, वापरलेल्या स्प्रे नळ्या, इलेक्ट्रीक लहान मोटर आदी साहित्य वापरून हा सॅनेटायझर तंबू तयार करण्यात आला आहे. रूग्णालयात प्रवेश घेणाºया प्रत्येक रुग्णाला हात धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असून हात धुतल्यावर रुग्णास सॅनिटाईज करण्यासाठी तंबूतून जावे लागते. तंबूतून जाताना चोहोबाजूने अंगावर औषध फवारणी होत असल्याने केसांवर, कपड्यांवर असलेले विषाणू नाश पावतात. रूग्णालयात रूग्णांना सोशल डिस्टन्सिंग ठेवावे म्हणून तशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात सॅनिटाईज करण्यासाठी कुलकर्णी रूग्णालयातील सॅनेटायझर तंबूचा प्रयोग हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे.