शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी ५६ शेतकऱ्यांनी भरले वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वीज वितरण कंपनीच्या कृषी योजनेंतर्गत पाचोराबारी येथील ५६ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी २३ लक्ष रुपये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : वीज वितरण कंपनीच्या कृषी योजनेंतर्गत पाचोराबारी येथील ५६ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी २३ लक्ष रुपये वीजबिल थकबाकी भरून योजनेत सहभाग नोंदविला आहे. या वेळी ५० टक्के वीजबिल सुटीचा लाभही या शेतकऱ्यांनी घेतल्याची माहिती महावितरणचे ग्रामीण एक उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार यांनी दिली.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कृषी योजना २०२० अंतर्गत शेतकऱ्यांना थकीत वीजबिलावर ५० टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. त्यानुसार, पाचोराबारी येथील ५६ शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार यांची भेट घेतली. याप्रसंगी पवार यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी वीजबिल योजनेची माहिती दिली. योजनेंतर्गत चालू महिन्याचे वीजबिल भरून थकबाकीच्या योजनेवर ५० टक्के सुटीसह सहभाग घेतल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली. यानंतर सर्व ५६ शेतकऱ्यांनी मिळून त्यांच्याकडील लाभाची थकबाकी वजा जाता एकाच दिवशी २३ लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे करून या योजनेचा लाभ घेतला. तसेच जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या वीजबिलाची माफी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी सहायक अभियंता राजीव रंजन, कनिष्ठ अभियंता रामेश्वर चव्हाण, प्रगतशील शेतकरी अल्पेश पटेल व इतर उपस्थित होते.