शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

संततधार सरींनी जिल्हा ‘आबादानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 20:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने बुधवारीही जोर कायम ठेवला़ यातून जिल्ह्यातील नदी-नाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने बुधवारीही जोर कायम ठेवला़ यातून जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत होत़े सर्वच तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात पावसाने संततधार हजेरी लावल्याने ‘आबादानी’ झाल्याचे दृश्य नजरेस पडत होत़े  नंदुरबार   शहरासह तालुक्यात पावसाने बुधवारी सकाळी 9 वाजेनंतर संथ सुरुवात करत दुपारी जोर धरला़ यातून तालुक्यातील शिवणसह, अमरावती, सुकळीसह इतर नद्यांच्या पात्रातून पाणी वाहत असल्याचे स्थानिकांना दिसून येत होत़े शिवण नदीत पाणी आल्याने नंदुरबार शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात पाणीसाठा होत असल्याचे सांगण्यात आले आह़े दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे नंदुरबारात दशा माता मूर्ती खरेदीसाठी आलेल्या महिला भाविक पावसातच देवीची मूर्ती डोक्यावर घेत वाजत गाजत निघाल्या होत्या़  तळोद्यात सकाळपासून पावसाने हजेरी लावली़ शहरासह दुर्गम भागात पावसाची रिपरिप सुरु होती़ अद्याप बोरद परिसरातील निझरा नदीला मोठा पूर आला नसला तरी पावसामुळे समाधान व्यक्त करण्यात येत होत़े संततधार पावसामुळे शेतशिवारातील कामे पूर्णपणे बंद असल्याने मजूरांचे मात्र हाल होत आहेत़ पावसाने उघडीप दिल्यानंतर कामांना सुरुवात होणार आह़े दरम्यान तळोदा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाजवळ चिंचेचे झाड पावसामुळे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती़  यामुळे हातोडा मार्गाने होणारी बसवाहतूक पूर्णपणे बद करण्यात आली़ सायंकाळी झाड हटवल्यानंतर रस्ता मोकळा होऊन तळोदा नंदुरबार वाहतूक सुरळीत झाली़ शहादा  शहरात बुधवारी सकाळ पासूनच सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे शहर व शहरातील नवीन वसाहतीत पाणीच पाणी झाले आह़े यातून नवीन वसाहतीतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होत़े नवीन वसाहतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे जिकिरीचे झाले होत़े डोंगरगाव रस्त्यावरील द्वारकाधीश नगर, कुबेर नगर, तलाठी कॉलनी या भागात पक्के रस्ते नसल्याने  पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून चिखल झाल्याने रहिवासी घरांमध्ये अडकून पडले आहेत़ शहरातील नागसेन नगर परिसरात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याने हाल झाल़े या भागात गटारींची योग्य सोय नसल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत़े गुडघ्याएवढे पाणी साचल्याने बाहेर पडण्यासही अडचणी येत होत्या़ 

नंदुरबार ते प्रकाशा रस्त्यावर कोरीट फाटय़ाजवळची स्थिती बुधवारी अत्यंत भीषण झाली होती़ याठिकाणी मंगळवारीही वाहने अडकली होती़ चांदवा नाल्याचे पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने चिखलातून वाहन काढताना दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांची भंबेरी उडत होती़ मंगळवारी याठिकाणी अपघात झाल्यानंतर तात्पुरत्या उपाययोजना करण्याची अपेक्षा होती़ कोळदे ते कोरीट फाटय़ादरम्यान जागोजागी रस्ता काँक्रिटीकरणावर झालेला चिखल निसरडा असल्याने दुचाकी वाहनधारकांचे अपघात होत आहेत़ दुपारी कोरीट गावाजवळ तापी नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने बघ्यांची गर्दी झाली होती़ बॅरेजचे सर्व दरवाजे वर घेतले गेल्याने येथून हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आह़े यातून पुलापासून काही अंतरावर पाणी आल्याचे दिसून आले होत़े प्रशासनाकडून कोरीट येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून याठिकाणी अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून असल्याची माहिती देण्यात आली आह़े पाऊस सुरु असताना काही हौशींकडून तापीच्या पुलावर सेल्फी काढण्याचे धोकेदायक प्रकार सुरु असल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली़