शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : इधर चला मै उधर चला.. अरे फिसल गया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 12:37 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘इधर चला मै उधर चला, जाने कहां मै किधर चला.. अरे ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘इधर चला मै उधर चला, जाने कहां मै किधर चला.. अरे फिसल गया..’ ऋतिक रोषण यांच्या कोई मिल गया या चित्रपटातील गिताचा बोलाप्रमाणे सध्या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची अवस्था झाली आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावरच बहुतांश नेते व कार्यकत्र्यानी पक्षांतर केल्यामुळे निवडणूक प्रचारात कुठे ना कुठे जुन्या पक्षाची आठवण येतेच आणि नेमके त्यामुळे ऐनवेळी या नेत्यांची ‘विकेट’पडल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या शेवटच्या टप्प्यात प्रचार सभा, रॅलीला वेग आला आहे. उमेदवारांच्या सभांच्या वेळी त्यांच्या भाषणातून जुन्या पक्षाची आठवण होतांना दिसून येत आहे. उदेसिंग पाडवी यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या नंदुरबार येथील सभेत सर्व काँग्रेसचेच उमेदवार निवडून येईल असे सांगून विधानसभा निहाय उमेदवारांची यादी सांगतांना नवापूरमधून माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत हे निवडून येईल असे त्यांनी जाहीर केले. त्यावेळी व्यासपीठावरील कार्यकत्र्यानी मात्र त्यांना नवापूरचा काँग्रेसचा उमेदवार शिरिष नाईक असल्याचे आठवण करून दिली. त्यामुळे त्यांना चुकीची दुरूस्ती करावी लागली. असाच प्रकार भाजपच्या नवीन उमेदवारांबाबतीत दिसून येत आहे. त्यांनी आपले प्रचाराचे बॅनर सुरुवातीलाच बनविले होते. त्यात काही बॅनरमध्ये पक्षाच्या नेत्यांचे फोटो छापले. त्यात उदेसिंग पाडवी यांचाही फोटो दिसून येतो. हे फोटो काही ठिकाणी बॅनर कापून, बॅनरवर फोटोचा  भाग झाकून किंवा बॅनर बदलून दुरूस्ती करण्याचे प्रय} दिसून येत आहे.चंद्रकांत रघुवंशी यांनीही ऐनवेळी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. सध्या ते युतीच्या उमेदवारांचे प्रचार करीत आहेत. या प्रचारात त्यांचे कार्यकर्तेही सहभागी होत आहेत. मात्र बहुतांश कार्यकत्र्याच्या मोबाईल मध्ये  रघुवंशी यांनी पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘हातासाठी मत पाहिजे..’ हे गाणे रिंगटोन दिली आहे. हे गाणे अधिकच लोकप्रिय झाल्याने अजूनही कार्यकत्र्याच्या मोबाईलमध्ये हीच रिंगटोन आहे. त्यामुळे प्रचाराच्या ऐनवेळी ही रिंगटोन खणकते तेंव्हा मात्र कार्यकत्र्याची चांगलीच गोची होते. नंदुरबारमध्ये डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रचारासाठी होणा:या सभांमध्ये रघुवंशी देखील आपल्या भाषणात पूर्वीचे राष्ट्रवादी व आताचे भाजपचे कार्यकर्ते तसेच पूर्वीेचे काँग्रेस आणि आताचे शिवसेनेचे कार्यकर्ते अशीच सुरुवात करतात. त्यातून कार्यकत्र्यामध्येही हशा पिकतो. असाच प्रकार नवापूर, धडगाव व शहाद्यात देखील पहायला मिळतो. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नाही. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी शहाद्यात भाजपमध्ये तर धडगावातील कार्यकत्र्यानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या कार्यकत्र्याच्या तोंडून आपसूकपणे घडय़ाळ्याला मत द्या असे तोंडातून शब्द निघून जातो. मात्र तात्काळ त्यांना आठवण होताच आपले शब्द बदलण्याची वेळ येते. प्रचारातील हे चित्र सध्या लोकांमध्ये चर्चेचा व मनोरंजनाचा विषय ठरत आहे.