कुजबुज - परत निवडणूक, परत खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST2021-03-19T04:29:48+5:302021-03-19T04:29:48+5:30

मुख्यमंत्री दाैऱ्याची अशीही चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नंदुरबार जिल्हा दाैरा अचानक घोषित झाल्यानंतर एकच चर्चेला उधाण आले होते. ...

Rumors - re-election, back spending | कुजबुज - परत निवडणूक, परत खर्च

कुजबुज - परत निवडणूक, परत खर्च

मुख्यमंत्री दाैऱ्याची अशीही चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नंदुरबार जिल्हा दाैरा अचानक घोषित झाल्यानंतर एकच चर्चेला उधाण आले होते. यात अनेकविध मजेशीर किस्सेही ऐकण्यास मिळत आहेत. धडगाव तालुक्यात मुख्यमंत्री येत असल्याचे वृत्त माध्यमात आल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली होती. यात नंदुरबार बसस्थानकावरचा दोघांचा संवाद जरा वेगळाच होता. यावेळी एकाने सोबतच्या प्रवाशाला विचारले, ‌‌‌‌अरे, मुख्यमंत्री कशासाठी येताहेत तुला माहिती आहे का? त्यावर दुसरा म्हणाला, नही ना, भो. यावर समाेरच्याने आपल्या ज्ञानाची पेटी उघडत सांगितले की, अरे कोकण मा समुद्रमा वीज तयार कराना भलता मोठा प्रकल्प येवाव, शे, तठोई मोदी वीज गुजरात मा लई जाई, त्यांना करता धडगाव मार्गे मोठी वायर टाकव शेत, यामुळे मुख्यमंत्री येई राह्यनात. त्यावर दुसरा लगेच म्हणाला, त्या काय आकडी टाकना करता जागा धुंडाव शेत का,.... दोघांच्या या संभाषणावर परिसरात एकच खसखस पिकली होती.

Web Title: Rumors - re-election, back spending