रोटरी क्लब ऑफ शहादाची नवीन कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST2021-07-05T04:19:27+5:302021-07-05T04:19:27+5:30

शहादा शहरात गेल्या चार वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून रोटरी क्लब ऑफ शहादा तापी व्हॅलीची स्थापना संस्थापक अध्यक्ष डॉ. योगेश चौधरी ...

Rotary Club of Shahada announces new executive | रोटरी क्लब ऑफ शहादाची नवीन कार्यकारिणी जाहीर

रोटरी क्लब ऑफ शहादाची नवीन कार्यकारिणी जाहीर

शहादा शहरात गेल्या चार वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून रोटरी क्लब ऑफ शहादा तापी व्हॅलीची स्थापना संस्थापक अध्यक्ष डॉ. योगेश चौधरी यांनी केली होती. शहादा शहरात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, सामाजिक उपक्रम, वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांच्या सहकार्याने ने रुग्णांची तपासणी आदी विविध उपक्रम रोटरी क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येतात. या क्लबच्या अध्यक्षपदी शहादा पालिकेचे माजी आरोग्य सभापती राकेश सुभाष पाटील यांची तर सचिवपदी संतोष पाटील यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत विशाल गारोळे, तुषार बारी, मयूर कुचेरिया, महेंद्र पाटील, श्याम सोनार, डॉ. योगेश चौधरी यांच्यासह युवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहादा शहर व परिसरात सामाजिक, सांस्कृतिक व वैद्यकीय सेवेसाठी आपण प्राधान्य देऊन नागरिकांची सेवा करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष राकेश पाटील यांनी सांगितले.

Web Title: Rotary Club of Shahada announces new executive