शस्त्राचा धाक दाखवून व्यापाऱ्याची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:30 IST2019-12-30T12:30:18+5:302019-12-30T12:30:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किराणा मालाची उधारी घेऊन परतणाºया व्यापाºयावर चौघांनी हल्ला करुन रोख रक्कम लुटून नेल्याची घटना ...

The robbery of a merchant by threatening a weapon | शस्त्राचा धाक दाखवून व्यापाऱ्याची लूट

शस्त्राचा धाक दाखवून व्यापाऱ्याची लूट

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : किराणा मालाची उधारी घेऊन परतणाºया व्यापाºयावर चौघांनी हल्ला करुन रोख रक्कम लुटून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी अक्कलकुवा ते खापर दरम्यान घडली़ चोरट्यांनी भररस्त्यात वाहन अडवून ही लुट केल्याची एकच खळबळ उडाली आहे़
अक्कलकुवा येथील व्यापारी सुनिल परशराम कुकरेजा हे शनिवारी सकाळपासून खापर परिसरात किराणा माल विक्रीच्या व्यवहारांची रक्कम वसुलीसाठी गेले होते़ वसुलीनंतर सायंकाळी ते चालक शाकिरअली मोतेबर अली सय्यद याच्यासह एमएच ३९ जे ५५२४ या वाहनाने परतत होते़ दरम्यान सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कौली गावाजवळ मागून मोटारसायकलींवर आलेल्या चौघांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला़ चालक शाकिरअली यांनी वाहन थांबवल्यानंतर हातातील लाठ्या, काठ्या व धाºयाने गाडीच्या काचा फोडून दोघांनाही मारहाण केली़ दरम्यान कुकरेजा यांच्या ताब्यातील १ लाख ३८ हजार रुपये रोख असलेली पिशवी हिसकावून घेत पळ काढला़ सायंकाळी घडलेल्या प्रकाराची माहिती कुकरेजा यांनी अक्कलकुव्यात दिल्यानंतर हा प्रकार समोर आला़
याप्रकरणी रात्री उशिरा सुनिल कुकरेजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघा चोरट्यांविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे करत आहेत़
घटनेनंतर पोलीस उपअधिक्षक विक्रम कदम व पोलीस निरीक्षक डांगे यांनी कौली गावाजवळ भेट देत माहिती घेतली़ चारही चोरटे २० ते २५ वयोगटातील असल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title: The robbery of a merchant by threatening a weapon