शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

खेतिया फाटा ते म्हसावद रस्त्याची लागली ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST

खेतिया फाटा ते म्हसावद गावापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अक्षरशः चाळण झाली आहे. दुचाकी वाहने नागमोडी वळणे घेऊन चालवावी ...

खेतिया फाटा ते म्हसावद गावापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अक्षरशः चाळण झाली आहे. दुचाकी वाहने नागमोडी वळणे घेऊन चालवावी लागतात तर चारचाकी वाहन कितीही खड्डे टाळले तरी खड्ड्यात वाहन पडते. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून पाठीचे, मणक्याचे, मानेचे आजार होऊन दुखणे वाढत आहे. वाहनेही नादुरुस्त होत आहेत. रस्त्याला लागून झाडांच्या फांद्या वाढून रस्त्यावर येत आहेत. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या गायब झाल्या आहेत. पाच दिवसापूर्वी खड्डे बुजवण्यात आले. मात्र दोन दिवसातच ‘जैसे थे’ परिस्थिती झाली. हा रस्ता एकप्रकारे संबंधितांसाठी कुरणच ठरले आहे. पाच मीटरचा रस्ता साडेतीन मीटरचा झाला तरी संबंधित विभागाला काहीच देणेघेणे नाही. उसाची वाहने उलटून अपघात होत आहेत. त्यातच नवलपूर, आवगे, फत्तेपूर गावाजवळ गतिरोधक चुकीच्या पध्दतीने टाकण्यात आले आहेत. हाच रस्ता महाराष्ट्रातील दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ व दुर्गम भागातील धडगावसारख्या तालुक्याला जोडणारा रस्ता असताना तो दुर्लक्षित झाला आहे. आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.

नवलपूर, पिंपरीच्यापुढे अशोका पेट्रोलियमजवळ तर रस्ता शोधावा लागतो. जुनवणे व नवलपूर फाट्यावरील गतिरोधक ‘असून अडथळा नसून खोळंबा’ असे ठरत आहेत. दोन महिन्यात खड्डे दुरूस्ती तर सोडाच संबंधित विभागाने ढुंकूनही पाहिले नाही. आता बुजवले तेही एक सोडून एक खड्डा बुजवला. नवलपूर फाट्यावरील बाभळीचे झाड वाकून रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वाराला फांद्यांचा फटका हमखास बसतो. धडगाव, तोरणमाळसारख्या अतिदुर्गम भागाकडे जाणारा एकमेव मुख्य रस्ता असूनही दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्याची दुरुस्ती करुन वाहनधारकांना दिलासा द्यावा अन्यथा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.