शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी वसुंधरा’ अभियान कामांचा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :   ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत येथे वृक्षलागवड व गाव स्वच्छतेसाठी शपथ देण्यात आली. जि.प.चे मुख्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :   ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत येथे वृक्षलागवड व गाव स्वच्छतेसाठी शपथ देण्यात आली. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट देऊन कामांचा आढावा घेतला.           ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत येथे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या कामांचा आढावा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी घेतला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, जि.प.चे माजी सदस्य रामचंद्र पाटील, सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, जि.प. सदस्या भारतीबाई भिल, पंचायत समिती सदस्य जंग्या भिल, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, तलाठी डी.एम. चौधरी, ग्रामपंचायत सदस्य अरुण भिल, महेंद्र भोई, दिलीप पाटील, नंदकिशोर पाटील, भावडू ठाकरे, गणेश पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी केदारेश्वर मंदिर व बॅरेजलगत वृक्षारोपण करून ज्याठिकाणी वृक्षलागवड केली आहे तेथे गावडे यांनी पाहणी केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानाची शपथ देण्यात आली. रामचंद्र पाटील म्हणाले की, या अभियानात जर फंड मिळाला तर आम्हाला काम करताना अडचणी येणार नाहीत. तसेच अंगणवाड्यांना संरक्षक भिंतीची गरज आहे. जेणेकरून लावलेले वृक्ष आम्हाला जगवता येतील.           उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ म्हणाल्या की, ज्यांचे शौचालय बांधायचे राहिले असतील त्यांनी लागलीच दोन दिवसांत     प्रस्ताव पाठवा, आपण मंजूर करून    देऊ, ज्यांना नळकनेक्शन हवे असेल, शाळा, अंगणवाड्या, वैयक्तिक यांनाही पाणी परवानगी लवकर देण्यात येईल. ‘माझी वसुंधरा’ अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवून गावाच्या विकासासाठी मदत करावी, असे आवाहन केले.            मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे म्हणाले की, वृक्षलागवड केल्यानंतर त्याच्या संवर्धनासाठी अडचणी येतात. परंतु लोकांच्या सहभागातून आपण ते काम पूर्ण केले पाहिजे. गावाच्या सहभागातून हे अभियान यशस्वी करावे. पृथ्वी, जल, आकाश, अग्नी, वायू या सर्व गोष्टींचा विचार करून प्रकाशा ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंत चांगले गुण मिळवले आहेत. अजून थोडी मेहनत घेण्याची गरज आहे. असे झाल्यास गावाला बक्षीस मिळू शकते, असे     त्यांनी सांगितले. प्रास्ताविक  ग्रामविकास अधिकारी बी. जी. पाटील यांनी तर सूत्रसंचालन नरेंद्र गुरव यांनी केले.