शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल प्रशासन, पोलीस व नगरपालिका प्रशासनातर्फे वऱ्हाडींवर २६ हजारांची दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST

शहादा शहराला लागून असलेल्या मंगल कार्यालयावर गेल्या दोन दिवसांपासून महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाकडून भरारी पथक नेमून ...

शहादा शहराला लागून असलेल्या मंगल कार्यालयावर गेल्या दोन दिवसांपासून महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाकडून भरारी पथक नेमून दंडात्मक कारवाई होत असल्याने मंगल कार्यालय मालकांमध्ये भीतीचे वलय निर्माण झाले आहे? लग्न सोहळा व खासगी कार्यक्रमास मंगल कार्यालय भाड्याने द्यावे किंवा नाही? अशा द्विधा मनःस्थितीत असताना प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई सुरू असल्याने मंगल कार्यालय आता बंद केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही? प्रशासनाने सुरू केलेल्या धडक मोहिमेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई सुरू केल्याने मंगल कार्यालय तात्पुरते बंद ठेवावीत, असा निर्णय मंगल कार्यालय मालकांना घ्यावा लागणार आहे?

मंगल कार्यालय बंद झाले असले तरी अनेक विवाह सोहळा व सामाजिक कार्यक्रम मोकळ्या जागेवर वऱ्हाडी मंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत, मोठ्या संख्येचा उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन सुरूच आहे, अशा या कार्यक्रमांवर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न मंगल कार्यालय धारक व सामान्य जनता उपस्थित करीत आहेत.

कोविड १९ च्या उपाय योजनांतर्गत विविध सुरक्षा उपाययोजनांचे आदेश दिले असून, या आदेशाचे उल्लंघन झाल्याने हा दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दिलेले आहे. दरम्यान जिल्ह्यात प्रथमच विवाह सोहळ्यात वऱ्हाडी मंडळीने चेहऱ्यावर मार्क्स न लावणे ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळी लग्न सोहळ्यास उपस्थित राहणे या कारणामुळे जिल्ह्यात प्रथमच दोन मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. शहादा शहरात व परिसरात लग्न सोहळा व सामाजिक उपक्रम असलेल्या ठिकाणी ५० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती व चेहऱ्यावर मास न लावणे आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी सांगितले.