शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात जनता कर्फ्यूला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST

शहरात विविध रस्त्यांवर ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यात गरीब नवाज कॉलनी, ...

शहरात विविध रस्त्यांवर ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यात गरीब नवाज कॉलनी, खेतिया रस्ता, जुना प्रकाशा रस्ता, तसेच अन्य ठिकाणी पालिका प्रशासनाने बॅरिकेट्स लावली आहे. शहरात सकाळी सहा वाजल्यापासूनच पोलीस गस्त करीत होते. मुख्य रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील मुख्य वर्दळ असलेल्या पुरुषोत्तम मार्केट, का. स. पाटील मार्केट, चार रस्ता, मेन रोड, खेतिया रस्ता, भाजी मार्केट, बसस्थानक आवारात कमालीचा शुकशुकाट होता. जनता चौक, चार रस्ता, पाण्याची टाकी, खेतिया रस्ता, डोंगरगाव रस्ता, तूपबाजार, गरीब नवाज कॉलनी, मेमन कॉलनी, डोंगरगाव रस्ता यासह प्रमुख रस्ते बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. ग्रामीण भागातील कोणतेही वाहन शहरात दाखल होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद आहेत.

प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी, स्वच्छता निरीक्षक आर. एम. चव्हाण, नगरपालिका अभियंता संदीप टेंभेकर, मंडळ निरीक्षक पी. बी. अमृतकर, आदी अधिकारी शहरात फिरून मुख्य रस्त्यांवर गस्त करीत होते. शहरातील वाढती रुग्णांची संख्या बघता रुग्णवाहिकादेखील कमी पडल्या आहेत. एकंदरीत शहरात पूर्णतः व्यवहार ठप्प असून, शुकशुकाट आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी अगोदरच आठवडाभरापूर्वी जिल्ह्यात दर शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू राहणार असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यम व शहरातील गल्लीबोळात रिक्षाने भ्रमणध्वनीद्वारे नागरिकांना सूचित करण्यात आले होते. असे असतानादेखील विनाकारण शहरात मोटारसायकलीवर फिरणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. रविवारी रस्त्यावर कोणीही विनाकारण फिरू नये, अन्यथा कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.