वाघाळे येथे लॉकडाऊनला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST2021-04-17T04:30:20+5:302021-04-17T04:30:20+5:30

बामखेडा येथे उपाययोजना बामखेडा - महिनाभरापासून ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आपले ...

Response to lockdown at Waghale | वाघाळे येथे लॉकडाऊनला प्रतिसाद

वाघाळे येथे लॉकडाऊनला प्रतिसाद

बामखेडा येथे उपाययोजना

बामखेडा - महिनाभरापासून ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आपले कुटुंब व आपले आरोग्य तसेच गावाची काळजी घेण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सरपंच मनोज चौधरी यांनी केले.

शहादा तालुक्यातील बामखेडा येथे ग्रामपंचायत यंत्रणेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रत्येकाला मास्क लावणे व सॅनिटायझर वापरणे, शारीरिक अंतर ठेवण्याबाबतचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून करण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनामार्फत गावातच विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सौम्य लक्षणे असल्यास रुग्णांनी कक्षात स्वत: दाखल व्हावे व कोरोना थांबविण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच मनोज चौधरी यांनी केले. यावेळी उपसरपंच उखा भिल, ग्रामसेवक मनीष रामोळे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्यसेविका अलका मराठे व आशा वर्कर्स, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Response to lockdown at Waghale