शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

परसबागेद्वारे पोषण स्थिती सुधारण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आश्रमशाळेत परसबाग तयार करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद, एकात्मिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आश्रमशाळेत परसबाग तयार करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय तळोदा आणि युनिसेफ मुंबई यांनी संयुक्तपणे हाती घेतला असून त्या माध्यमातून विद्याथ्र्याची पोषण स्थिती सुधारण्याचा संकल्प भांग्रापाणी आश्रमशाळेत आयोजित कार्यशाळेत करण्यात आला. युनिसेफद्वारा दोन्ही तालुक्यातील प्रत्येकी 17 आश्रमशाळेतील अधीक्षक, शिक्षक आणि विद्याथ्र्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात  आले. प्रशिक्षणात तज्ञांनी पोषण परसबागेचे महत्त्व सांगितले. यावेळी परसबाग तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यात चार बाय 20 अंतराच्या जागेत नऊ इंच उंचीचा मातीचा बेड तयार करून घेण्यात आला. या परसबागेला कमी पाणी लागते आणि त्यात बेडवर   फळभाज्या, वेलवर्गीय व पालेभाज्या तर बेडभोवती शेवगा, हादगा, पपई, आवळा, लिंबू आदी झाडे लावता येतात. युनिसेफतर्फे 12 प्रकारच्या भाज्या व शेवग्याची रोपे पुरविण्यात आली आहेत. नंतरच्या टप्प्यात स्थानिक पातळीवर बियाणे बँक तयार करून स्वावलंबी करण्यात येणार आहे.जुलै अखेर्पयत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सर्व आश्रमशाळेत परसबाग तयार करण्यात येणार आहे. यासाठी युनिसेफद्वारे संनियंत्रण करण्यात येणार असून प्रकल्प अधिकारी  तळोदा आढावा घेणार आहेत. प्रशिक्षण कार्यशाळेसाठी युनिसेफचे राज्य सल्लागार डॉ.गोपाळ पंडगे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प अधिकारी  रमेश डुडी, अतिरिक्त प्रकल्प  अधिकारी एस.आर. सोलंकी यांचे मार्गदर्शन लाभले. रक्तक्षय  आणि कुपोषणापासून विद्याथ्र्याना  दूर ठेवण्यासाठी त्यांच्या दैनंदिन जेवणात हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या आवश्यक आहेत. त्याचे महत्व विद्याथ्र्यार्पयत पोहोचविण्यासाठी आणि स्थानिक स्तरावर भाज्यांची उपलब्धता करून देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.