शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
8
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
9
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
10
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
11
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
12
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
13
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
14
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
15
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
16
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
17
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
18
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
19
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
20
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

हाय रिस्क १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 11:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/विसरवाडी/सारंगखेडा : विसरवाडी, शहादा व सारंगखेडा येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/विसरवाडी/सारंगखेडा : विसरवाडी, शहादा व सारंगखेडा येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या अहवालांकडे गेल्या चार दिवसांपासून लक्ष लागून होते. शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील रुग्णाच्या संपर्कातील सहा जणांचे अहवाल, सारगंखेडा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कातील चार आणि म्हसावद येथील एक असे पाच आणि विसरवाडी येथील सहा जणांचा त्यता समावेश आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हरिश्चंद्र कोकणी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी माहिती दिली. त्याचप्रमाणे मालेगावहून नवापूर येथे आलेल्या एका ग्रामसेविकेचा अहवालदेखील निगेटिव्ह आला. तसेच घोगलपाडा येथील एका व्यक्तीचा संपर्क नंदुरबार येथील पॉझिटिव्ह रूग्णाशी आला होता त्या व्यक्तीच्या अहवाल देखील निगेटिव्ह आला. दोन खाजगी डॉक्टर, एक परिचारिका, २ प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच रुग्णवाहिका चालकाचा त्यात समावेश आहे.मालेगाव येथून सारंगखेडा येथे आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील चार व्यक्ती आणि म्हसावद येथील एक व्यक्ती असे पाच नमुने निगेटीव्ह आले आहेत. परिणामी ग्रामीण भागात कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक तीन येथील गरीब नवाज कॉलनी परिसरात लागोपाठ दोन कोरोना बाधीत रुग्ण शहरात आढळून आल्याने खळबळ उडाली होती.जवळपास महिनाभराच्या अंतरानंतर हे दोन्ही रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या दोन्ही रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर स्वॅब नमुने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले होते.या दोन्ही रुग्णांच्या अतिसंपर्कातील सात जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तालुक्यातील तिन्ही रुग्णांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.