दुरुस्ती कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:23+5:302021-07-07T04:37:23+5:30

सेंद्रीय भाजीपाल्याला पसंती नंदुरबार : तालुक्यातील पूर्वभागात पिकविला जाणारा भाजीपाला शहरातील नागरिकांची पसंती ठरत आहे. मर्यादित वेळेत भाजीपाला ...

Repair work stalled | दुरुस्ती कामे रखडली

दुरुस्ती कामे रखडली

सेंद्रीय भाजीपाल्याला पसंती

नंदुरबार : तालुक्यातील पूर्वभागात पिकविला जाणारा भाजीपाला शहरातील नागरिकांची पसंती ठरत आहे. मर्यादित वेळेत भाजीपाला विक्रीसाठी बाजारपेठ मिळत असल्याने बहुतांश शेतकरी मुख्य रस्त्यांलगत भाजीपाला स्टाॅल लावून त्यांची विक्री करत आहेत. यातून त्या-त्या मार्गांनी प्रवास करणारे भाजीपाला खरेदी करण्यास पसंती देत आहेत. विशेष बाब म्हणजे अनेकजण शहरातून भाजीपाला खरेदीसाठी येथे जातात.

गतिरोधकांची मागणी

नंदुरबार : दोंडाईचा ते नंदुरबार रस्त्यावर रनाळे गावाजवळील वटबारे फाट्यावर गतिरोधकांची मागणी आहे. भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर गतिरोधकांची अपेक्षा आहे. वटबारे गावाकडून भरधाव वेगात येणा-या वाहनांना अपघात होण्याची भीती असल्याने येथे गतिरोधक आवश्यक आहेत.

शिवण नदीवरील पूल अद्यापही कठड्याविना

नंदुरबार : नंदुरबार ते विसरवाडीदरम्यान शिवण नदीवरील पूल वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. महामार्ग म्हणून घोषित असलेल्या या रस्त्याचे नूतनीकरण अद्यापही रखडले आहे. नंदुरबार ते भादवड दरम्यान असलेल्या या पुलावरून दरदिवशी मोठ्या संख्येने मालवाहू आणि प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू असते. परंतु कठडे नसल्याने धोेकेदायक स्थिती आहे.

Web Title: Repair work stalled