शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शेवाळी-नेत्रंग महामार्गाची येत्या आठवडय़ात दुरुस्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 15:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा, अक्कलकुवा आणि पुढे गुजरात हद्दीर्पयतच्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे हैराण झालेल्या वाहनधारकांना येत्या आठवडय़ात दिलासा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा, अक्कलकुवा आणि पुढे गुजरात हद्दीर्पयतच्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे हैराण झालेल्या वाहनधारकांना येत्या आठवडय़ात दिलासा मिळण्याची शक्यता आह़े सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग प्राधिकरण विभागाने सुमारे 40 किलोमीटर अंतरासाठी ठेकेदार नियुक्त केल्याची हा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत़              दरम्यान शेवाळी ते नेत्रंग या 754 बी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या चार वर्षापासून रखडले आह़े राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित असलेल्या या रस्त्याचे हस्तांतरण काही दिवसांपूर्वी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील महामार्ग प्राधिकरणकडे वर्गीकृत करण्यात आले होत़े यातून केंद्र सरकारने या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामालाही मंजूरी दिलेली नसल्याने गत चार वर्षात रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आह़े मार्गावर तळोदा, अक्कलकुवा ते थेट गव्हाळीर्पयत पडलेले जीवघेणे खड्डे अपघात घडवून आणत आहेत़ महामार्गाची दुरुस्ती व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता़ यातून सार्वजनिक बांधकाम विभागाने धुळे येथील संबधित महामार्ग प्राधिकरणला माहिती दिल्यानंतर रस्ता दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करुन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आह़े या ठेकेदाराला येत्या आठवडय़ात कार्यरंभ आदेश मिळण्याची शक्यता असून सुमारे 40 किलोमीटर अंतरात खडी, डबर आणि डांबर टाकून खड्डे बुजवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े तळोदा ते गव्हाळी अशा 40 किलोमीटर अंतरात हे काम केले जाणार आह़े तातडीने होणारे हे दुरुस्तीचे काम नेमके किती दिवस टिकेल, याची कोणतीही शाश्वती मात्र देण्यात आलेली नाही़ महामार्गाचा मूळ चौपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून असून त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याची माहिती देण्यात आली आह़े 

साक्री तालुक्यातील शेवाळी ते गुजरात राज्यातील नेत्रंग या दरम्यानच्या या ‘शॉर्टकर्ट’ रस्त्याची 753 बी अशी निर्मिती करण्यात आल्यानंतर त्याचे चौपदरीकरण होणार असे सातत्याने सांगितले जात होत़े परंतू हा रस्ता नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग करुन चौपदरीकरणाचा प्रस्ताव देण्याचे सांगण्यात आल़े  गेल्या चार वर्षात या प्रस्तावाचा एकही कागद मंजूर झालेला नाही़ याबाबत कारवाई कधी होणार याची माहिती नसून पाठपुरावाच सुरु आह़े 

साक्री तालुक्यातून नंदुरबार जिल्ह्यात आणि मग गुजरात मध्ये जाणारा हा महामार्ग सोयीचा असल्याने येथून वाहनांची वर्दळ वाढली होती़ यातून अक्कलकुवा तालुक्यात रस्त्याची सर्वाधिक दुरवस्था आह़े नॅशनल हायवेकडून रस्ता पीडब्ल्यूडीकडे वर्ग झाल्यानंतर विस्तारीकरणाची कोणतीही प्रक्रिया न झाल्याने हा रस्ता संबधित विभागाकडे केवळ देखभाल दुरुस्तीसाठी आह़े परंतू त्यासाठी निधीच नसल्याने खड्डे बुजवण्याची कारवाई झाली नव्हती़ विशेष म्हणजे सर्वाधिक अंतर नंदुरबार जिल्ह्यातून जाणा:या या महामार्गाचे कामकाज धुळे येथील बांधकाम विभागातून चालवले जात असल्याने दुरुस्ती रखडल्याचे बोलले जात आह़े