दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST2021-03-14T04:27:39+5:302021-03-14T04:27:39+5:30

राज्यातील टंचाईग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची दोन वर्षांची परीक्षा फी परत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष ...

Refund of examination fee to 10th and 12th class students | दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत

राज्यातील टंचाईग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची दोन वर्षांची परीक्षा फी परत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०१७-१८ व २०१८-१९ या दोन्ही वर्षी वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात परीक्षा फी जमा होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा फी परत घेण्यासाठी आवश्यक माहिती आपल्या वर्गशिक्षकांकडे किंवा कार्यालयात जमा करावे. विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, परीक्षा दिल्याचे वर्ष, पालकाचे बचत खाते असल्यास खातेदाराचे संपूर्ण नाव, विद्यार्थ्यांचे खातेदाराशी नाते, खातेदाराचा आधार नंबर, बँकेचा बचतखाते क्रमांक, बँकेचा आय.एफ.एस.सी. कोड, एम.आय.सी.आर.कोड आदी माहिती विद्यार्थ्यांनी जमा करावी, असे आवाहन प्राचार्य सुनील सोमवंशी यांनी केले आहे.

Web Title: Refund of examination fee to 10th and 12th class students