महिलेवर बलात्कार शनिमांडळ येथील एकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:44 IST2020-04-05T11:43:52+5:302020-04-05T11:44:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शनिमांडळ येथील एकाविरुद्ध महिलेच्या आरोपावरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक उर्फ छोटू ...

Rape on a woman crime against one in Saturn | महिलेवर बलात्कार शनिमांडळ येथील एकाविरुद्ध गुन्हा

महिलेवर बलात्कार शनिमांडळ येथील एकाविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शनिमांडळ येथील एकाविरुद्ध महिलेच्या आरोपावरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक उर्फ छोटू रामभाऊ पाटील, रा.शनिमांडळ, ता.नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. २०१५ ते ३ एप्रिल २०२० या दरम्यान अशोक पाटील यांनी महिलेवर त्यांच्याच घरी वेळोवेळी शाररिक अत्याचार केले. एक वेळा तीन महिन्याचा गर्भपात देखील केला. महिलेला जातीवाचक बोलून ठार मारण्याची देखील धमकी दिली.
याबाबत महिलेने फिर्याद दिल्याने अशोक पाटील यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक रमेश पवार करीत आहे.

Web Title: Rape on a woman crime against one in Saturn