रेल्वेचे तांत्रिक कर्मचारीही सेवेसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 12:38 IST2020-04-12T12:37:57+5:302020-04-12T12:38:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात प्रवासी रेल्वे वाहतूक बंद असली तरी मालवाहतूकीच्या रेल्वेगाडय़ा सुरू आहेत. त्यामुळे रेल्वेच्या ...

Railway technical staff also ready for service | रेल्वेचे तांत्रिक कर्मचारीही सेवेसाठी सज्ज

रेल्वेचे तांत्रिक कर्मचारीही सेवेसाठी सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात प्रवासी रेल्वे वाहतूक बंद असली तरी मालवाहतूकीच्या रेल्वेगाडय़ा सुरू आहेत. त्यामुळे रेल्वेच्या ट्रॅकची देखभाल, दुरूस्तीची कामे नियमित सुरू असून अधिकारी व कर्मचा:यांना 24 तास देखरेख ठेवून दक्ष राहावे लागत आहे. 
23 मार्चपासून लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा ठप्प आहे. सर्वच प्रकारच्या प्रवासी रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट दिसून येत आहे. ठराविक वेळेनंतर मात्र मालगाडय़ा येतांना व जातांना तेवढय़ा दिसून येत आहे. प्रवासी गाडय़ा नसल्यामुळे मालगाडय़ांनाही जास्तवेळ थांबून राहावे लागत नाही. 
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील वस्तू, संरक्षण सामुग्री, इंधन, जीवनाश्यक वस्तू यांचा पुरवठा देशभर वेळेत व्हावा, सुरळीत व्हावा यासाठी मालवाहतुकीला अशा काळात सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. देशसेवेच्या या काळात रेल्वे सेवेतील अधिकारी व कर्मचारी  देखील आपले कर्तव्य बजावत  आहेत. मालगाडय़ांना वेळेवर पोहचवले जावे, अपघात होऊ नयेत, तांत्रिक कारणास्तव त्या खोळंबून राहू नयेत यासाठी तांत्रिक कर्मचारी डोळ्यात तेल घालून सेवा करीत आहेत. 
लॉकडाऊनधील त्यांचे हे काम लक्षणीय ठरत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत आणि ऊन, तापमान याची पर्वा न करता रेल्वेतील हे अधिकारी व कर्मचारी एकप्रकारे देशसेवाच करीत आहेत. 
 

Web Title: Railway technical staff also ready for service