रेल्वेखाली कापला गेल्याने रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST2021-03-24T04:28:46+5:302021-03-24T04:28:46+5:30

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १७ मार्च रोजी दुपारच्या वेळेस रेल्वे रुळावर खांब क्रमांक १६५/२०-२४ जवळ रेल्वे ...

A railway employee died after being cut under a train | रेल्वेखाली कापला गेल्याने रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

रेल्वेखाली कापला गेल्याने रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १७ मार्च रोजी दुपारच्या वेळेस रेल्वे रुळावर खांब क्रमांक १६५/२०-२४ जवळ रेल्वे लाईनचे काम करीत असताना स्नेहल सुरेश चाबुकस्वार हे पाणी पिण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत असताना भुसावळकडून सुरतकडे जाणारी मालगाडी टी. एस. डब्ल्यू. एस. ही अचानक आल्याने त्यांना दिसली नाही. म्हणून सदर मालगाडी स्नेहल चाबुकस्वार यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. याबाबत भवानीसिंग मानसिंग राजपूत यांनी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अंमलदार पोहेका सुनील अहिरे, असई राजू मोरे करीत आहेत. नंदुरबार रेल्वे ट्रॅकमॅन कर्मचारी वर्गात शोककळा पसरली असून मयत स्नेहल चाबुकस्वार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी तसेच तीन वर्षांची मुलगी आहे.

Web Title: A railway employee died after being cut under a train