खेडदिगर येथे जुगारावर धाड, सात जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 13:02 IST2020-07-25T13:02:08+5:302020-07-25T13:02:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खेडदिगर, ता.शहादा येथे जुगार खेळणाऱ्या सात जणांवर म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

Raid on gambling at Kheddigar, crime against seven persons | खेडदिगर येथे जुगारावर धाड, सात जणांवर गुन्हा

खेडदिगर येथे जुगारावर धाड, सात जणांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खेडदिगर, ता.शहादा येथे जुगार खेळणाऱ्या सात जणांवर म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फकिरा ईश्वर निकुंभ, संजय शंकरलाल मेहता, प्रवीण मोहन साटोटे, बलवंत झगा जाधव, दिनेश सुपडू निकुंभ, यादव खंडू अहिरे सर्व रा.खेतिया व सुरेश नथ्थू कोळी, रा.खेडदिगर अशी संशयीतांची नावे आहेत. खेडदिगर येथील बसस्थानक समोरील आडोशाला जुगार सुरू असल्याची माहिती म्हसावद पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता सात जण जुगार खेळतांना आढळून आले. पोलिसांनी सातही जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, २० मोबाईल व तीन दुचाकी असा एकुण दोन लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस कर्मचारी विशाल नागरे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार बिºहाडे करीत आहे.

Web Title: Raid on gambling at Kheddigar, crime against seven persons