शहाद्यात २० जणांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:17 IST2020-05-17T13:17:47+5:302020-05-17T13:17:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क घालणे अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे, तोंडावर मास्क ...

 Punitive action against 20 martyrs | शहाद्यात २० जणांवर दंडात्मक कारवाई

शहाद्यात २० जणांवर दंडात्मक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क घालणे अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे, तोंडावर मास्क न लावणे, रस्त्यावर थुंकणाऱ्या २० नागरिकांवर पालिकेच्या विशेष पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
शहादा शहरात मुख्य बाजार अंतर्गत येणाºया सर्व भागात पालिकेतर्फे मोहीम राबविण्यात आली असून तोंडावर मास्क न घालणाºया १२ व सोशल डिस्टन्सिंग न ठेवण्याबाबत सहा दुकानदार तसेच रस्त्यावर थुंकणाºया दोन नागरिकांनवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे एकूण १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. वेळोवेळी दुकांनदार, भाजीपाला विक्रेते व नागरिकांना सूचना दिल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने तसेच मॉस्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही मोहीम मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक राजू चव्हाण, आस्थापना प्रभारी चेतन गांगुर्डे, अभियंता आशिष महाजन, नगररचनाकार स्वप्निल वाडीले, बांधकाम विभागाचे यशवंत भारुडे, अजिंक्य डोडवे, कर निरीक्षक राजेंद्र सैंदाणे, पुरुषोत्तम शिवदे, दिलीप सोनवणे, अनिल पाटील, समीर शेख, सागर साळुंके व स्वच्छता विभागातील सहायक गोटूलाल तावडे आदींनी केली.
दरम्यान, ही मोहीम सुरू असताना के.एस. मार्केटमधील दुकानदाराकडे कॅरीबॅग आढळ्याने त्याच्याकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.

Web Title:  Punitive action against 20 martyrs