शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

भरदुपारी दागिने चोरणाऱ्यास पब्लिक मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 11:59 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील विरल विहारमध्ये भर दुपारी घरात घुसून दागिने चोरणाऱ्या चोरट्यास घरमालक आणि परिसरातील नागरिकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील विरल विहारमध्ये भर दुपारी घरात घुसून दागिने चोरणाऱ्या चोरट्यास घरमालक आणि परिसरातील नागरिकांनी पकडून चोप देत पोलीसांच्या स्वाधीन केले़ रविवारी सकाळी १० ते दुपारी दोन वाजेदरम्यान हा प्रकार घडला़ ताब्यात घेण्यात आलेला चोरटा हा हिस्ट्रीशिटर असून त्याच्याविरोधात जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल आहेत़संतोष दिलीप तिजविज रा़ चांभारवाडा असे चोरट्याचे नाव आहे़ रविवारी सकाळी त्याने विरल विहारमधील संतोषी माता मंदिराजवळील इंदिरा हनुमानराम चौधरी यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता़ यावेळी त्याने घरातील कपाट फोडून आतील तिजोरीत ठेवलेले १ लाख रुपये किमतीचे ४ तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले होते़ याचदरम्यान घरमालक इंदिरा चौधरी ह्या त्यांच्या आईसह घरी परतल्या होत्या़ घराला कुलूप नसल्याचे पाहून त्या चकीत झाल्या होत्या़ त्या घरात गेल्या असता संतोष तिजविज हा घरातील वस्तू चोरी करत असल्याचे त्यांना दिसून आले़ दोघींनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने दोघांना धक्का देत पळ काढला होता़ यावेळी आरडओरड सुरु झाल्याने याच भागात राहणारे राजकुमार सुकलाल जैन व मदनलाल जैन यांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले़ दरम्यान महिलांना धक्का देत पळ काढणाºया चोरट्यास परिसरातील रहिवाशांनी बेदम चोप दिला होता़ या प्रकाराची माहिती शहर पोलीस ठाण्यात मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार व पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी याठिकाणी भेट देत चोरट्यास ताब्यात घेतले़ त्याच्याविरोधात इंदिरा चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ चोरटा संतोष याने धक्का दिल्याने इंदिरा व मतराबाई ह्या जखमी झाल्या आहेत़

दरम्यान पोलीसांनी रविवारी रात्री उशिरा संतोष तिजविज यास अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता़ सोमवारी सकाळी त्याला शहर पोलीसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडून सुनावण्यात आली़ संतोष तिजविज याच्याविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे़ वेळोवेळी शहरातील घरफोडीच्या घटनेत त्याचे नाव समोर आले आहे़