रेमडेसिविर व बेड उपलब्ध करा, अन्यथा खुर्ची सोडा- भाजप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:30 AM2021-04-18T04:30:16+5:302021-04-18T04:30:16+5:30

पत्रकात म्हटले आहे, नंदुरबार जिल्ह्यात शासकीय व खाजगी रूग्णालय कोरोना रुग्णांनी हाउसफुल्ल आहेत. रुग्णांना उपचारासाठी बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन, ...

Provide remedies and beds, otherwise leave the chair - BJP | रेमडेसिविर व बेड उपलब्ध करा, अन्यथा खुर्ची सोडा- भाजप

रेमडेसिविर व बेड उपलब्ध करा, अन्यथा खुर्ची सोडा- भाजप

Next

पत्रकात म्हटले आहे, नंदुरबार जिल्ह्यात शासकीय व खाजगी रूग्णालय कोरोना रुग्णांनी हाउसफुल्ल आहेत. रुग्णांना उपचारासाठी बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हे ठाकरे सरकारचे अपयश आहे.

नंदुरबार जिल्ह्यात ५० हजार पेक्षा अधिक रुग्ण कोरोना संसर्ग बाधित आहेत यापैकी ४० हजार बाधित घरीच उपचार घेत असल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. इंजेक्शनची गरज भासत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यात काही खासगी रुग्णालय रेमडीसिविर इंजेक्शनचे दर अव्वाचे सव्वा आकारीत आहेत.

याद्वारे आम्ही मागणी करतो की, जिल्ह्याच्या जनतेला विनाविलंब रेमडीसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, बेड उपलब्ध करून द्यावे व आवश्यक त्या आरोग्याच्या सुविधा द्याव्यात. अन्यथा भारतीय जनता पार्टी नंदुरबार असहकार चळवळ पुकारेल असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकात दिला आहे.

Web Title: Provide remedies and beds, otherwise leave the chair - BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.