कोरोना आटोक्यात आणणारी औषधी जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 12:54 PM2020-07-13T12:54:11+5:302020-07-13T12:54:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनावर प्रभावी इजाज असलेली औषधी जिल्हा नियोजन समिती आणि आदिवासी विकास विभागामार्फत खरेदी करुन ...

Provide Corona control medication from the District Planning Committee | कोरोना आटोक्यात आणणारी औषधी जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करा

कोरोना आटोक्यात आणणारी औषधी जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनावर प्रभावी इजाज असलेली औषधी जिल्हा नियोजन समिती आणि आदिवासी विकास विभागामार्फत खरेदी करुन जिल्ह्यात देण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे़ पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांना हे निवेदन देण्यात आले आहे़
नंदुरबार नगर पालिकेच्या भाजप नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी यांनी दिलेल्या या निवेदनात, नंदुरबार जिल्हा कोरोना हॉटस्पॉट होवू पहात आहे़ कोरोनावर प्रभावी औषध म्हणून रेमडेसिवीऱ, टोसीलिझम, फॅबिफिव्हर या औषधी उपयोगी पडत आहेत़ मात्र आदीवासी बहुल व मानवी निर्देशांकात खालच्या पातळीवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी बांधव ही औषधी विकत घेऊ शकणार नाहीत़ साधारण ४० हजार रूपयांच्या घरात याऔषधी व इंजेक्शन्स आहेत़ या औषधांची खरेदी जिल्हा नियोजन व आदिवासी विकास विभागामार्फत करुन जिल्हा रुग्णालयाला देण्यात यावी़ जिल्हा रूग्णालयात कायम स्वरुपी शववाहीनी उपलब्ध करुन द्यावी तसेच नंदुरबार जिल्हा रूग्णालयाचा एक तपासणी कक्ष नंदुरबार नगरपालिकेच्या जयप्रकाश नारायण रूग्णालयात तातडीने सुरू करावा़ जेपीएन रुग्णालयात पॅथलॉजी व एक्सरे सुविधा उपलब्ध असून आरोग्य कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत़ यामुळे कोरोनासारख्या आजाराची तपासणी व उपचार शक्य होणार असल्याने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे़ निवेदनावर नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत़

Web Title: Provide Corona control medication from the District Planning Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.