शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच निवडीची प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST

हिंगणी, ता. शहादा बामखेडा - शहादा तालुक्यातील हिंगणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता भूपेंद्र पवार तर उपसरपंच पदासाठी सुनील बापू भिल ...

हिंगणी, ता. शहादा

बामखेडा - शहादा तालुक्यातील हिंगणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता भूपेंद्र पवार तर उपसरपंच पदासाठी सुनील बापू भिल यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

शहादा तालुक्यातील हिंगणी ग्रामपंचायतीत मीनाबाई मणिलाल पटेल, संगीता भूपेंद्र पवार, वंदना हिरालाल पारधी, रत्ना विलास भिल, भारती देवीदास मराठे, सुनील बापू भिल, जिजाबाई संतोष कोळी हे बिनविरोध निवडून आले होते. यातून शुक्रवारी सरपंच व उपसरपंच निवडही बिनविरोध करण्यात आली. सरपंच पदासाठी संगीता पवार तर उपसरपंच पदाकरीता सुनील भिल यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी देवरे यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. यावेळी ग्रामसेवक बाविस्कर व तलाठी सावळे उपस्थित होते. बिनविरोध निवडीसाठी सूतगिरणीचे विद्यमान संचालक सुनील पाटील, भिका मराठे, प्रवीण पुनाजी पटेल, किरण पाटील, संजय पटेल, चंद्रकांत अशोक पटेल, मणिलाल पाटील, दिनेश पटेल, सुरेश साळुंखे, पोलीस पाटील वाल्मीक दाभाडे, कैलास दाभाडे, माजी उपसरपंच हिरामण कोळी, रमेश भिल, विनोद भिल, चुनीलाल मराठे यांनी परिश्रम घेतले.

फेस ता. शहादा

बामखेडा -फेस ता.शहादा येथे सरपंचपदी लहू पूना भिल तर उपसरपंचपदी राकेश एकनाथ पाटील यांची निवड झाली.

सरपंचपदासाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत लहू भिल यांच्याविरोधता विरोधात किशोर पाटील तर उपसरपंच पदासाठी राकेश पाटील यांचा विरोधात ज्योती चित्ते उमेदवारी अर्ज दिले होते. यात लहू भिल यांनी एका मताने किशोर पाटील यांचा पराभव केला. राकेश पाटील यांना उपसरपंच पदासाठी चार मते मिळाली त्यांनी ज्योती चित्ते यांचा पराभव केला. सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली फेस ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला होता. पॅनल प्रमुख संजय चौधरी, सातपुडा साखर कारखान्याचे संचालक ओंकार चौधरी, गणेश पाटील,योगेश पाटील,किरण पाटील,दिनेश चौधरी, राजेंद्र चौधरी, सूदाम कोळी, लीलाचंद पाटील यांनी सरपंच व उपसरपंच निवडीसाठी परिश्रम घेतले. ग्रामपंचायत सदस्य पद्माबाई रगदेव भिल, राजश्री गणेश पाटील, बतीबाई चतुर भिल, ज्योती एकनाथ भिल, रामलाल सुकदेव मोरे, किशोर आत्माराम पाटील, अलका विलास चौधरी हे यावेळी उपस्थित होते.

बामखेडा ता. शहादा

सारंगखेडा - शहादा तालुक्यातील बामखेडा तर्फे सारंगखेडा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती. सरपंचपदी साधना सखाराम पाटील यांची तर उपसरपंचपदी रमणबाई छोटू सोनवणे यांची बिनविरोध यांची निवड झाल्याने तेथे ग्रामपंचायतीवर आता महिलाराज आला आहे.

बामखेडा ग्रामपंचायत निवडणुकीत सामाजिक कार्यकर्त्या हेमलता शितोळे व माजी पंचायत समिती सदस्य सखाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली होती. शुक्रवारी निवडणूक निर्णय एन.पी.साळवे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंच पदासाठी साधना पाटील व उपसरपंच पदासाठी रमणबाई सोनवणे यांचे अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अजय पाटील मायाबाई पाटील, हरसिंग पवार, जतन बोरसे अंबिका सोनवणे उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष आनंद उत्सव साजरा केला. सामाजिक कार्यकर्ता हेमलता शितोळे, पंचायत समितीचे माजी सदस्य सखाराम पाटील, माजी सरपंच राजू बोरसे, अजय पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियात निवडणूक निर्णय अधिकारी साळवे यांना तलाठी, ग्रामसेवक हेमराज पाटील, पोलीस पाटील सुभाष पवार यांनी सहाय्य केले. सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बंधारपाडा ता. नवापूर

विसरवाडी-नवापूर तालुक्यातील बंधारपाडा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी प्रियंका शंकर गावित तर उपसरपंचपदी याकूब रमेश गावित यांनी प्रत्येकी सहा- सहा मते मिळवून विजय प्राप्त केला.

ग्रामपंचायत बंधारपाडा ची निवडणूक नुकतीच झाली. नवापूर पंचायत समिती सदस्य कांतीलाल महा-या गावित यांच्या पॅनलने सहा जागा मिळवल्या तर विरुध्द पक्षास चार जागांवर समाधान मानावे लागले.

सरपंच पदासाठी प्रियंका शंकर गावित व महिमा चिमन गावित यांच्यात सरपंच पदासाठी तर याकूब रमेश गावित व राहुल रवींद्र गावित यांच्यात उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली.त्यात प्रियंका शंकर गावित या सरपंच म्हणून तर याकुब रमेश गावित हे उपसरपंच म्हणून प्रत्येकी दहापैकी सहा मतांनी निवडून आले.

निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी बी.एन.सोनवणे यांनी काम पाहिले तर तलाठी जी.एस तडवी यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत वसंत वळवी, अनिल बाबजी गावित, जयमाला महेश गावित, रजनी बहादूर सिंग गावित व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो कॅप्शन- नवापुर तालुक्यातील बंधारपाडा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी प्रियंका शंकर गावित तर उपसरपंच म्हणून याकुब रमेश गावित यांची निवड.

असलोद ता. शहादा

शहादा तालुक्यातील असलोद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुशिलाबाई प्रकाश भिल यांची तर उपसरपंच पदासाठी विलास प्रकाश पवार यांची निवड करण्यात आली.

असलोद ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी निवडणूक झाली होती. सरपंच पद हे अनुसुचित जमाती महिला वर्गासाठी राखीव होते. रविवारी असलोद येथे सरपंच निवड कार्यक्रम पार पडला. यांतर्गत भाजपा पुरस्कृत बी एस.पी. फाउंडेशनकडून विजयी झालेल्या सुशिला भिल व विलास पवार या दोघांची सरपंच व उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गुलाब भिल, दीपक भीमसिंग गिरासे ,संतोष देविदास चव्हाण ,तूकीबाई प्रकाश भिल, सरलाबाई अजय गिरासे, रेखाबाई लिलाचंद पवार ,सुलोचना दिलीप पवार उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून एम .आर. देव (विस्तार अधिकारी) व ग्रामसेवक एम.जी .जाधव यांनी कामकाज पाहिले