शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात वीज पुरवठ्याची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST

पाणीटंचाईवर मात करण्याची मागणी धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणीटंचाईत वाढ होत आहे. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना ...

पाणीटंचाईवर मात करण्याची मागणी

धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणीटंचाईत वाढ होत आहे. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये विंधन विहिरी खोदण्याचे काम अद्यापही सुरु झालेले नाही.

नुकसान भरपाई देण्याची मागणी

नंदुरबार : तालु्यातील काकर्दे व सिंदगव्हाण परिसरात गेल्या आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतीचे सरसकट पंचनामे करुन भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे. या भागात बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे वार्षिक गणित बिघडले आहे.

शेतीकामांना गती

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे परिसरात शेतीकामांना गती देण्यात येत आहे. या भागात हरभरा कापणी व गहू कापणीला वेग आला आहे. यामुळे मजूरांना रोजगार उपलब्ध होत आहे. परिसरातील मजूर आसपासच्या गावांच्या शिवारातही कामांसाठी बोलावले जात आहेत.

समस्या कायम

धडगाव : तालुक्याच्या विविध भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पथदिवे सुरु करण्याबाबत उदासिनता कायम आहे. आरोग्य केंद्रांमध्ये लाखो रुपयांचा खर्च करुन साैर पथदिवे आणि हायमस्ट लावण्यात आले होते. परंतू हे दिवे सध्या बंद पडले असल्याचे दिसून येत आहे.

भाजीपाला उत्पादक संकटात

नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागात भाजीपाला उत्पादित करुन त्याची विक्री बाजार समितीत करणाऱ्या शेतकऱ्यांना संकटाने घेरले आहे. दोन दिवसांच्या लाॅकडाऊननंतर एप्रिल महिन्यात पुन्हा लाॅकडाऊन असल्याने भाजीपाला उत्पादक अडणीत येणार आहेत. तालुक्याच्या विविध भागात पिकवला जाणारा भाजीपाला दीर्घकाळ साठवण्याची सोय नसल्याने शेतकरी आतापासून हैराण झाले आहेत.

फिरते पथक वाढवा

नंदुरबार : आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात फिरत्या स्वॅब संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. ही पथके ग्रामीण भागात पोहोचत आहेत. परंतू पथकांची संख्या कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक जण अद्यापही वंचित असल्याने पथकांची संख्या वाढवण्याची मागणी आहे.

गावांमध्ये शुकशुकाट

नंदुरबार : दोन दिवसीय लाॅकडाऊनला शनिवारी प्रारंभ झाला. यात शहरी भागाचा समावेश असला तरीही ग्रामीण भागात अनेकांनी व्यवसाय बंद ठेवल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये अनेकांनी काही तास दुकाने सुरु ठेवत कोरोनाला हरवण्याचा चंग बांधला आहे.

हिंस्त्र प्राण्यांच्या संचाराने वाढली चिंता

बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरातील गावांमध्ये हिंस्त्र प्राण्यांचा धोका कायम आहे. बोरदसह सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांच्या शिवारात अस्वल आणि बिबट्यांच्या पावलांचे ठसे दिसून येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

पीक कर्ज द्यावे

बोरद : तळोदा तालुक्यातील नियमित पीक कर्ज घेणाऱ्या

शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने एप्रिल महिन्यात कर्जाचे वितरण करण्याची मागणी होत आहे. याबाबत शेतक-यांनी पाठपुरावा सुरु केला आहे. दरम्यान ग्रामीण बँकांकडूनही कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरु करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.