रोहयोअंतर्गत शेतात वृक्ष लागवडीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:30 IST2019-08-03T12:30:00+5:302019-08-03T12:30:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांचा आढावा घेतला.  जॉबकार्डधारकांचे बँक खाते आधार कार्डशी ...

Prior to planting trees in the fields under Rohio | रोहयोअंतर्गत शेतात वृक्ष लागवडीला प्राधान्य

रोहयोअंतर्गत शेतात वृक्ष लागवडीला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांचा आढावा घेतला. 
जॉबकार्डधारकांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करावे, अपूर्ण कामांना गती देऊन कालमर्यादेत पुर्ण करावे, वन विभागाने गावस्तरावर लहान रोपवाटीका तयार करून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न    करावा, अशा सुचना त्यांनी दिल्या.  प्रत्येक तालुक्यात किमान दोन टेकडय़ांवर वृक्षारोपण व संवर्धन करण्यात यावे. वनविभागाने यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करावे. नाविन्यपूर्ण योजना अथवा सीएसआरमधून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रय} करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. चांगली कामगिरी  करणा:या अधिकारी-कर्मचा:यांना प्रमाणपत्र देण्यात येईल, असेही ते म्हणाले. 
मनरेगा अंतर्गत काम करताना जल व भूसंधारणांची कामे 65 टक्के होतील याबाबत विशेष दक्षता बाळगण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

रोहयोअंतर्गत शेतात वृक्ष लागवडीला प्राधान्य

रोजगार हमी योजनेअंतर्गत शेताच्या बांधावर आणि शेत जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.  शेतक:यांना आर्थिक लाभ मिळावा हा उद्देश त्यामागे आहे. त्यासाठी शेतक:यांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपवनसंरक्षक अनिल थोरात, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक ए.के.दानापुणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाटील उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, कागद उद्योगासाठी सुबाभूळला चांगली मागणी आहे. सुबाभूळची लागवड केल्याने शेतक:याला वर्षभराच्या मजुरीसोबत झाडापासून उत्पन्न मिळते. 100 रोपांसाठी तीन वर्षात 50 हजार 695 तर प्रति हेक्टरी 2500 रोपांसाठी लागवडीपूर्व ते प्रथम वषार्साठी एक लाख 31 हजार 406 रुपये देय आहेत. या कार्यक्रमामुळे वर्षभर रोजगार उपलब्ध होणार असल्याने शेतक:यांनी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी  41 शेतक:यांच्या एक लाख 17 हजार झाडांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. 
साग, चंदन, खाया, निम, चारोळी, मोहगणी, आवळा, हिरडा, बेहडा, अजरुन, सीताफळ, चिंच, जांभूळ, बाभूळ, अंजन, बिबा, खैर, काजू, आंबा, फणस, ताड, सिंदी, सुरू, शिवण, शेवगा, हादगा, कढीपत्ता, महारुख, म्यान्जीयम, मेलिया या   पैकी कोणत्याही प्रजातीची निवड करता येईल. निलगिरी व सुबाभूळसाठीदेखील शेतक:यांना प्रोत्साहीत करण्यात येणार आहे.  इच्छुक लाथार्थी   जॉबकार्डधारक असावा व त्याच्यानावे जमीन असणे आवश्यक आहे. लाभाथ्र्याने दुस:या व तिस:या वर्षी बागायती वृक्षाच्या बाबतीत 90 टक्के व कोरडवाहू किमान 75 टक्के झाडे जिवंत ठेवल्यास त्याला अनुदान देय असेल.    
 

Web Title: Prior to planting trees in the fields under Rohio