विसरवाडी येथे प्रार्थना स्थळांनाही लागले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:40 IST2020-03-26T12:39:57+5:302020-03-26T12:40:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे जीवनावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापने व दुकाने व्यवसायिकांनी बंद ठेवण्यात ...

Prayers were also locked at Vissarwadi | विसरवाडी येथे प्रार्थना स्थळांनाही लागले कुलूप

विसरवाडी येथे प्रार्थना स्थळांनाही लागले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे जीवनावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापने व दुकाने व्यवसायिकांनी बंद ठेवण्यात आली आहेत़ येथील सर्व धर्मियांनी आपापल्या प्रार्थना स्थळांना कुलूप लावले असल्याने गावात शुकशुकाट पसरला आहे़
विसरवाडी येथे ४० गावांचा संपर्क असलेली मोठी बाजारपेठ आहे़ त्यामुळे गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे़ या पार्श्वभूमीवर विसरवाडी ग्रामपंचायत काटेकोरपणे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत आहे़ संचारबंदी दरम्यान गावातील किराणा दुकान, वैद्यकीय सेवा, दूध, भाजीपाला या जीवनावश्यक सेवा सुरु आहेत़ बाजारपेठेत सकाळी ९ ते दुपारी तीन या काळात किराणा दुकाने सुरु ठेवली जात आहेत़
गावात संचारबंदी लागू असल्याने नागरिक घरात बसून आहेत़ दरम्यान धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद आहे़ लांबच लागणाऱ्या वाहनांच्या रांगा पूर्णपणे बंद असून एखाद ुदुसरे वाहन या मार्गाने ये-जा करताना दिसून येत आहे़ महामार्गावरील हॉटेल व्यवसाय देखील बंद करण्यात आले असल्याने तेथेही शुकशुकाट निर्माण झाला आहे़

Web Title: Prayers were also locked at Vissarwadi