शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा गावाची पुन्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल, १५ जूननंतर एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा हे सुमारे १५ हजार लोकवस्तीचे गाव आहे. २२ मार्च २०२० पासून कोरोना ने ...

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा हे सुमारे १५ हजार लोकवस्तीचे गाव आहे. २२ मार्च २०२० पासून कोरोना ने शिरकाव केल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र ९ सप्टेंबर २०२० रोजी गावात पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर मात्र गावात रुग्णांची वाढ झाली होती. त्यामुळे प्रकाशा ग्रामपंचायत, महसूल, आरोग्य, शिक्षण विभाग, पोलीस यंत्रणा या सर्वांनीच कंबर कसली होती. विविध उपक्रम, वेळोवेळी गावात फवारणी, विलगीकरण कक्षाची निर्मिती, घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी, गरज वाटल्यास लॉकडाऊन आदींमुळे गावात कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. गेल्यावर्षी २०२० मध्ये येथे १०९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर दोन जणांचा मृत्यू झाला होता. १ जानेवारी २०२१ पासून ९ जूनपर्यंत प्रकाशा गावात कोरोनाचे ५२ रुग्ण आढळून आले होते. पैकी मे महिन्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. १ जून ते १४ जूनपर्यंत सहा रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर १५ जून ते आजपर्यंत म्हणजे ९ जुलैपर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून प्रकाशा गावात एकही रुग्ण न आढळल्याने गाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, ज्या गावात रुग्णसंख्या व कोरोनाची स्थिती आटोक्यात आहे अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग विचाराधीन आहे. प्रकाशा गावात महिनाभरापासून एकही रुग्ण नाही म्हणून येथे आठवीच्या पुढील वर्ग सुरू करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

लस घेणाऱ्यांची संख्या वाढली

प्रकाशा येथे कोरोना लस घेणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज येणारे लसीचे २५० डोसदेखील कमी पडत आहेत. सुरुवातीला ग्रामस्थांनी कोरोनाची लस घ्यावी यासाठी शिक्षकांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली. आरोग्य विभागानेही ठिकठिकाणी शिबिरे घेतली. तसेच लस घेतल्यानंतर चांगला परिणाम समोर आल्यानंतर लोक आता स्वतःहून लस घेण्यासाठी दवाखान्यात गर्दी करीत आहेत. १८ वर्षांवरील वयोगटांतील सर्वांनाच लस देणे सुरू झाल्यामुळे आता दवाखान्यात गर्दी होऊ लागली आहे. प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४५ वर्षावरील आतापर्यंत तीन हजार ८३६, तर १८ वर्षांवरील एक हजार २६ जणांनी लस घेतली आहे.