पावणेसात लाखाची वीज चोरीप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST2021-03-20T04:28:50+5:302021-03-20T04:28:50+5:30

नंदुरबार : सहा लाख ५३ हजार ५७० रुपयांची ३२ हजार ४१२ रुपयांच्या वीज चोरीप्रकरणी खापर येथील एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ...

Power theft case of Rs | पावणेसात लाखाची वीज चोरीप्रकरणी गुन्हा

पावणेसात लाखाची वीज चोरीप्रकरणी गुन्हा

नंदुरबार : सहा लाख ५३ हजार ५७० रुपयांची ३२ हजार ४१२ रुपयांच्या वीज चोरीप्रकरणी खापर येथील एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देविचंद सोनराज जैन, रा. खापर, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, देविचंद जैन यांनी त्यांच्या घरासाठी घेतलेल्या वीज पुरवठ्यात फेरबदल करून गेल्या दोन वर्षांत तब्बल ३२ हजार ४१२ रुपयांची वीज चोरी केली. त्याची एकूण किंमत सहा लाख ५३ हजार ५७० रुपये इतकी आहे. त्याचा तडजोड आकार २२ हजार रुपये एकत्रित करून सहा लाख ७५ हजार ५७० रुपये रक्कम भरण्यासाठी त्यांना वीज कंपनीकडून देयक देण्यात आले होते; परंतु त्यांनी मुदतीत देयक भरले नाही. त्यामुळे वीज कंपनीच्या भरारी पथकाचे बकूळ रामदास मानवटकर यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून देविचंद जैन यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार गुलाब जोहरी करीत आहेत.

Web Title: Power theft case of Rs