शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

घाट सेक्शनमधील बंद झाल्यास पर्यायी मार्गावरील रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST

मोलगी परिसर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे क्षेत्र असून, तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी मोलगी, डाब, अक्कलकुंवा हा मार्ग आहे. मात्र, या मार्गावरील ...

मोलगी परिसर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे क्षेत्र असून, तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी मोलगी, डाब, अक्कलकुंवा हा मार्ग आहे. मात्र, या मार्गावरील घाट सेक्शन रस्त्याच्या कामासाठी हा रस्ता ३० जूनपर्यंत बंद करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली, तर मोलगी परिसरातील नागरिकांना अक्कलकुंवा येथे येण्यासाठी साकलीउमर, जुनवाणी, सरी, दहेल, मोगरा, ओघाणी, काटसखाई, वालंबा, होरफडी या मार्गाने अक्कलकुंवा येथे जाण्यासाठी व गुजरात राज्यात जाण्याकरिता हा एकमेव मार्ग आहे. मात्र, या रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, मार्गातील अनेक ठिकाणी फरशी पूल तुटले असून, रस्त्यावर खड्डे पडून उखडडेला आहे. दहेल मोगरा घाटातील रस्ता दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, संबंधित विभाग दखल घेत नसल्याचे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मार्गावरील वाहनधारकांचे वाहन सुखरूप काढताना हाल होत आहेत. मोलगी, दाब, अक्कलकुंवा मार्ग बंद झाल्यास पर्यायी मार्गावरील रस्ता दुरुस्ती करणे आवश्यक आहे; अन्यथा रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढून नागरिकांपुढे जीविताचा प्रश्न निर्माण होणार असून, प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता आहे.