शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात ७७ जणांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : विनाकारण शहरात मोटरसायकलींवर फिरणाऱ्या व गर्दी करणाऱ्यांसह कायदा आणि नियमांचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर पोलिसांतर्फे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : विनाकारण शहरात मोटरसायकलींवर फिरणाऱ्या व गर्दी करणाऱ्यांसह कायदा आणि नियमांचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली आहे. या वेळी ४० मोटरसायकल स्वार, ३७ जण मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळण्यांवर सायंकाळी उशिरापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.नंदुरबार जिल्हा आॅरेंज झोनमध्ये असला तरी ज्या भागात जास्त रूग्ण सापडले आहेत त्या भागात सर्वांना निर्बंध लावण्यात आलेले आहे. शहादा शहरात नऊ कोरोणाचे पॉझिटिव्ह रूग्ण सापडले होते. त्याअनुषंगाने प्रभाग क्रमांक सात, प्रभाग क्रमांक चार व प्रभाग क्रमांक दोन हे सर्व परिसर कंटेन्टमेंट झोन असून, या परिसरात सर्वांना येण्यास बंदी आहे. या वेळी जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांची गर्दी व्हायला लागली. मंगळवारी नियमांचे उल्लंघन करीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे प्रशासन हतबल झाले होते. हा सारा प्रकार बघता बुधवारी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.शहरात विनाकारण मोटरसायकलींवर फिरणारे तसेच डबलसीट मोटरसायकलस्वार, मास्क न लावलेले नागरिक व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाºयांवर पोलिसांनी आपला खाक्या दाखवला. कोणीही आता विनाकारण कायद्याचे उल्लंघन करेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारादेखील पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी स्वत: कारवाई केली. स्टेट बँक परिसर, बस स्थानक परिसर, जुने तहसील कार्यालय या भागात कारवाई करून ४० मोटारसायकली जप्त केल्या आहेत. सायंकाळी या सर्व मोटरसायकलस्वारांकडून प्रत्येकी हजार ते दोन हजार रूपये दंड वसूल केला जाणार असल्याचे सांगितले.पोलीस प्रशासनाने लावलेल्या निर्बंधाचे पालन करावे, विनाकारण बाजारात गर्दी करू नये, मोटरसायकलीवर डबल सीट फिरू नये, शहरातली परिस्थिती बघता नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, कायद्याची पायमल्ली केल्यास यापुढे कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिली. पोलिसांनी बुधावारी कारवाई केल्यानंतर दुपारी रस्त्यांवर शांतता निर्माण झालेली दिसून आली.