शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलाकडून लाॅकडाऊनमध्ये २८ हजार केसेस दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST

नंदुरबार : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून बेशिस्त लोकांवर २८ हजार १६१ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यातून ...

नंदुरबार : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून बेशिस्त लोकांवर २८ हजार १६१ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यातून ४२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली आहे. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये पोलिसांकडून अडीच हजार जणांवर केसेस करून २४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस दलाकडून एक एप्रिलपासून सुरू झालेल्या लाॅकडाऊन काळात विविध कारवाया करण्यात आल्या आहेत. यातून सातत्याने बेशिस्त लोकांकडून दंड वसूल करून गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखून धरण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस दलाकडून विनामास्कच्या एकूण १३ हजार ६४१ केसेस करण्यात आल्या असून, त्यातून २७ लाख २८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशांच्या उल्लंघनाच्या ५२८ केसेस करण्यात आल्या. यातून न्यायालयाने बेशिस्तांना ५२ हजार ५०० रुपयांचा दंड केला. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या एकूण ६६१ केसेस करण्यात आल्या. त्यातून १ लाख ३२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरू ठेवत व्यवसाय करणाऱ्या १६७ आस्थापनांवर कारवाई करून १ लाख ११ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याबाबत ४० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील ६५ दुकाने ही सील करण्यात आली. मनाई असतानाही रस्त्यावर आलेल्या रिक्षा, टॅक्सी व बस यांच्यावर १२ हजार ६३ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यातून १० लाख ९३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या ९०६ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ८१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. येत्या काळातही ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

विवाह सोहळ्याप्रकरणी तीन गुन्हे

या कारवाई अंतर्गत संचारबंदीत ७० केसेस करण्यात आल्या असून, परवानगी न घेता विवाह सोहळा घेत २५पेक्षा अधिक नातलगांच्या हजेरीमुळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात २० आरोपींविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वसूल करण्यात आलेल्या ४२ लाख ९९ हजार ६०० रुपयांची रक्कम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात जमा करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.