भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याला बैठकीनंतर पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 12:19 IST2020-01-19T12:19:49+5:302020-01-19T12:19:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा येथील शिवसेना कार्यालय जाळल्याच्या आरोप असलेले जिल्हा परिषद सदस्य कपिलदेव चौधरी यांना शुक्रवारी ...

Police arrest after meeting a BJP district council member | भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याला बैठकीनंतर पोलिसांनी केली अटक

भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याला बैठकीनंतर पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा येथील शिवसेना कार्यालय जाळल्याच्या आरोप असलेले जिल्हा परिषद सदस्य कपिलदेव चौधरी यांना शुक्रवारी जिल्हा परिषद आवारातून पोलिसांनी अटक केली. त्यांना ३ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या रात्री अक्कलकुवा येथील शिवसेनेचे कार्यालय जाळल्याचा प्रकार घडला होता. या जाळपोळीमागे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य कपीलदेव चौधरी व भाजप पदाधिकाऱ्यांसह इतर आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून जिल्हा परिषद सदस्य कपिलदेव चौधरी हे फरार होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी चौधरी हे जिल्हा परिषदेत आल्याची माहिती अक्कलकुवा पोलिसांना मिळाली. अक्कलकुवा पोलिसांचे पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाच्या मदतीने चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले.
निवडीची सभा संपल्यानंतर सर्व सदस्य बाहेर येत असतांनाच चौधरी यांना पोलिसांनी घेरून त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून थेट अक्कलकुवा येथे नेण्यात आले. याबाबत प्रचंड गोपनियता पाळण्यात आली होती. शनिवारी त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Police arrest after meeting a BJP district council member