शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

सक्षम वैद्यकीय सेवा नसल्याने नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील शासकीय रुग्णालयात सक्षम वैद्यकीय सेवा नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील शासकीय रुग्णालयात सक्षम वैद्यकीय सेवा नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे केवळ वैद्यकीय उपचार नव्हे तर अपघात, दुर्घटनेत व नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या पार्थिवावर शवविच्छेदनासाठी तालुक्यातील म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात जावे लागत आहे. शहरासह तालुक्यात अद्ययावत आरोग्य सेवा शासनाने उपलब्ध   करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.शहादा तालुका सर्वच दृष्टीने आघाडीवर असल्याचे सर्वश्रुत आहे. शहराचा औद्योगिक, शैक्षणिक व  अन्य विकास मोठय़ा प्रमाणात झाला असून नोकरी, शिक्षण, व्यवसाय आदीनिमित्त शहाद्याशी अन्य भागातील जनतेचा दैनंदिन संपर्क वाढलेला आहे. येथून राज्य महामार्गही जात असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. ग्रामीण भागातूनही कामानिमित्त ये-जा करणा:यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. शहादा व परिसरात वाहनांची संख्याही अधिक प्रमाणात आहे. रस्ते अपघात व नैसर्गिक आपत्तीत सापडून दुर्दैवी घटना घडल्यानंतर मृतदेहाच्या  शवविच्छेदनासाठी सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह न्यावा लागतो. वास्तविक शहादा येथे नगरपालिकेचे रुग्णालय आहे. मात्र या ठिकाणी शवविच्छेदनाची जबाबदारी पार पाडू शकणा:या वैद्यकीय अधिका:यांची कमतरता आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या शहादा येथे वर्ग एक वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. आजही शहाद्यात सक्षम वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने दुर्दैवी आकस्मिक मृत्यू, अपघाती घटना घडल्यानंतर मृतदेह शवविच्छेदासाठी सुमारे 15 किलोमीटर अंतरावरील म्हसावद येथे नेला जाणे अनिवार्य ठरते. यात मृतदेहाच्या हेळसांडसोबत नातेवाईकांना मोठय़ा प्रमाणात मनस्ताप सोसावा लागतो. शहादा पोलीस  ठाणेअंतर्गत शहादा शहरासह 96 गावांचा समावेश आहे. सुमारे दोन लाख लोकसंख्या यात समाविष्ट आहे. दररोज परिसरात किरकोळ घटना घडत असतात. यात प्रामुख्याने अपघात, नैसर्गिक आपत्तीद्वारे मृत्यू होणे, हाणामा:या यांचा समावेश आहे. या घटनातील मयतांसह जखमींना तसेच संशयीत आरोपींना वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पोलिसांना शहादा ते म्हसावद असा प्रवास प्रत्येक घटना घडल्यानंतर करावा लागतो. ज्या पध्दतीने यात मयतांच्या नातेवाईकांची हालअपेष्टा होते त्याच पद्धदतीने जखमींच्या नातेवाईकांसह वैद्यकीय चाचणीसाठी घेवून जाणा:या पोलिसांनाही अनेक कष्ट सोसावे लागतात.शहादा तालुक्यात गेल्या काही महिन्यात दोन मोठय़ा दुर्घटना घडल्या. यात वडछील, ता.शहादा येथे गणपती विसर्जनादरम्यान सहा तरुणांना आपला प्राण गमवावा लागला तर शहाणा, ता.शहादा येथे वीज झोपडीवर पडल्याने एक जण मयत तर पाच जण जखमी झाले होते. या दोन्ही घटनांमधील मयतांच्या पार्थिवांचे शवविच्छेदन करण्यासाठी नातेवाईकांसह पोलीस प्रशासनाला शहादा शहर जवळ असतानाही         केवळ येथील रुग्णालयात शवविच्छेदन होत नसल्याने म्हसावद येथे जावे लागले. तसेच जखमींना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सुमारे 40 किलोमीटर अंतर एवढा प्रवास करावा लागला. अशाच अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. हे सर्व थांबण्यासाठी नागरिकांना किमान आरोग्याच्या सेवा उपलब्ध होण्यासह मयतांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन वेळेत होणे अपेक्षीत असल्याने येथील शासकीय रुग्णालयात सक्षम तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी असणे काळाची गरज   आहे .

शहादा येथील सरकारी दवाखान्यात कायमस्वरुपी वर्ग-1 वैद्यकीय अधिका:याची नियुक्ती होण्याबाबत  माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्यामार्फत लोकप्रतिनिधी संवाद मंचने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र संबंधितांकडून वेळोवेळी आश्वासनच मिळाले आहे. शहादेकरांची या सुलतानी जाचातून सुटका करण्यासाठी शहादा येथे वर्ग-1  दर्जाच्या वैद्यकीय अधिका:यांची कायमस्वरुपी नियुक्ती करण्यासाठी जिल्हाधिका:यांनी संबंधितांना आदेशित करावे, अश अपेक्षा नागरिक लोकप्रतिनिधी संवाद मंचच्या पदाधिका:यांसह जनतेतून व्यक्त होत आहे.