शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर अन् कोरोनाच्या भीतीने गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST

नंदुरबार : रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी कमी व्हावी, यासाठी रेल्वेने प्लॅटफाॅर्मचे दर वाढविले आहेत. कोरोनामुळे घेण्यात आलेल्या निर्णयामुळे रेल्वे ...

नंदुरबार : रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी कमी व्हावी, यासाठी रेल्वेने प्लॅटफाॅर्मचे दर वाढविले आहेत. कोरोनामुळे घेण्यात आलेल्या निर्णयामुळे रेल्वे स्थानकावरची गर्दी आटोक्यात आली आहे. कोरोनाच्या भीतीनेही अनेक जण स्थानकात जाण्यास कचरत असल्याचे दिसून आले आहे.

उधना ते जळगाव रेल्वे मार्गावरच्या प्रमुख स्थानकांपैकी एक नंदुरबार आहे. गुजरात राज्याकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग असल्याने दर दिवशी शेकडोंच्या संख्येने प्रवासी मार्गक्रमण करतात. गेल्या कोरोना संक्रमणानंतर मात्र या संख्येवर परिणाम झाला होता. जून, २०२० पासून रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी अनेक निर्बंध असल्याने गर्दीवर नियंत्रण होते. यातून गेल्या काही महिन्यांत पुन्हा गर्दी वाढत असल्याने, रेल्वे प्लॅटफाॅर्म तिकीट हे ५० रुपये करून दिले आहे. हे तिकीट खरेदी करणे खर्चिक असल्याने अनेक जण नातेवाइकांना बाहेरच सोडून जात असल्याचे दिसून आले आहे. पूर्वी नातलगांना सोडण्यासाठी संपूर्ण कुटुंब येत होते. आता एखाद-दुसरी व्यक्ती थांबून नातेवाइकांना मार्गी लावत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी अनेक जण घरीच राहणे पसंत करत असल्याने ही स्थिती आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी येथे येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी करतात.

ही सेवा २४ तास सुरू आहे. हे कर्मचारी तपासणी करतील, या भीतीनेही अनेक जण रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये येत नसल्याचे दिसून आले आहे.

दररोज सात तर सप्ताहात धावतात ४० रेल्वेगाड्या

नंदुरबार रेल्वे स्थानकातून दिवसाला सात गाड्या नियमितपणे धावतात, तर ४० गाड्या या साप्ताहिक धावतात. या सर्व गाड्यांना नंदुरबार येथे थांबा आहे. यातून येणाऱ्या प्रवाशांची स्थानकात तपासणी केली जाते.

दररोज ६०० पेक्षा अधिक प्रवाशांची होते नोंदणी

नंदुरबार येथून देशभरात जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला नोंदणी करून सीट आरक्षित करणे सक्तीचे करण्यात आले आहे. यातून दरदिवशी ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने ६०० प्रवाशांची नोंदणी होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

१०० पेक्षा कमी प्लॅटफाॅर्म तिकिटांची होतेय विक्री

एकीकडे प्रवाशांची नोंदणी होत असताना, १०० पेक्षा अधिकचे प्लॅटफाॅर्म तिकीट घेतले जात नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तिकिटाचे दर अधिक असल्याने त्यांची खरेदी होत नसल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

नातेवाइकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलो होतो. प्लॅटफाॅर्म तिकीट काढून घेतले आहे. वेळोवेळी येथे यावे लागते. रेल्वे प्रवासासाठी सोईस्कर माध्यम आहे. कोरोनामुळे गर्दी कमी आहे.

- प्रशांत पाटील, नंदुरबार

रेल्वे स्थानकात आल्यानंतर प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपयांना असल्याची माहिती मिळाली. नातेवाइकांना सोडण्यासाठी आलो आहे. गाडीला उशीर असल्याने तिकीट खरेदी करून फलाटावर आलो आहे.

- योगेश चाैधरी, नंदुरबार

वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार कामकाज सुरू आहे. कोरोनामुळे रेल्वे स्थानकात होणारी गर्दी मर्यादित झाली आहे. आरोग्य तपासणी, मास्कचा वापर केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. प्रवाशांना सूचना करतो.

- सुभाष मंडल, स्टेशन मास्टर, नंदुरबार