साक्रीनाका परिसरात दगडफेक

By Admin | Updated: May 24, 2017 15:01 IST2017-05-24T15:01:16+5:302017-05-24T15:01:16+5:30

नंदुरबारमध्ये किरकोळ वाद : जमावाविरोधात गुन्हा दाखल

Picketing in Sakrinaka area | साक्रीनाका परिसरात दगडफेक

साक्रीनाका परिसरात दगडफेक

ऑनलाईन लोकमत 

नंदुरबार,दि.24- शहरातील साक्रानाका परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दोन गट एकमेकांवर धावून आल़े दोन्ही गटांना एकमेकांवर दगडफेक केल्याने काही काळ दहशत निर्माण झाली होती़ बुधवारी पहाटे जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ 
साक्रीनाका परिसरात पाताळगंगा नदीपुलावर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन गटात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली़ या बाचाबाची दरम्यान तलावपाडा भिलाटी व लहान माळीवाडा परिसरातील दोन गटांत हाणामारी सुरू झाली ही हाणामारी सुरू असताना दोन्ही गटात दगडफेक करण्यात आली़ प्रसंगी घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पथकाने जमावाला नियंत्रणात आणल्याने पुढील हानी टळली़ या प्रकारानंतर पोलीसांकडून रात्री उशिरार्पयत संशयित आरोपींची धरपकड सुरू होती़ रात्री दोन वाजेच्या सुमारास पोलीस हवालदार रामसिंग जामसिंग ठाकूर नेमणूक शहर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र रूदमा ठाकरे, दिनेश रूदमा ठाकरे, सोमनाथ मशुराम पाडवी, श्याम कन्हैय्या ठाकरे, दिपक राजू ठाकरे सर्व रा़ नंदुरबार यांच्यासह 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े यातील काहींचा पोलीसांकडून शोध घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े 

Web Title: Picketing in Sakrinaka area