शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसतर्फे जोडीदाराची विवेकी निवड कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या नंदुरबार शाखेतर्फे जोडीदाराची विवेकी निवड विभागामार्फत एक दिवसीय संवादशाळा घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या नंदुरबार शाखेतर्फे जोडीदाराची विवेकी निवड विभागामार्फत एक दिवसीय संवादशाळा घेण्यात आली.लग्नाळू मुले-मुली व पालकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. लग्नाआधी संबंध जोडताना समाजात पारंपरिक पद्धतीने आर्थिक परिस्थिती, नोकरी, शिक्षण या गोष्टींना प्राधान्यक्रम देऊन संबंध जोडले जातात. पण  दोन कुटुंबातील विचार, संस्कार, विवेक या गोष्टींना फारसे महत्व दिले जात नाही व पुढे विवाहानंतर ब:याचदा घटस्फोट, विसंवाद अशा घटना वाढत आहे. समाजात घडणारे हे प्रकार कमी व्हावे यासाठी अंनिसने युवक-युवती व पालक यांना जोडीदाराची विवेकी निवड असा विभाग सुरू केला आहे. येथे झालेल्या कार्यशाळेत मार्गदर्शक आरती नाईक व सचिन थिटे यांनी लग्न जमवण्याआधी युवक युवतीत कोणते विवेक तपासायला हवे, कोणत्या गोष्टीला जास्त महत्व दिले पाहिजे. हुंडा, मानपानाच्या भव्यतेपेक्षा दोन कुटुंबातील विचारांची अनुकूलता कशी महत्वाची आहे. हँडसम-ब्युटीफुल दिसण्यापेक्षा स्वभाव गुण सुंदर असणे का महत्वाचे अशा विविध विषयांवर  संवाद, पीपीटी, गटचर्चा करून कार्यशाळा झाली. कार्यशाळेसाठी शंभरहून अधिक युवक-युवती आणि पालक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागींनी  लग्न जमवण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबी तपासायला हव्यात हे आज ख:या अर्थाने समजले आहे, असे मत व्यक्त केले. सर्व सहभागीना प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यशाळेला अंनिसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.अजरुन लालचंदानी, उपाध्यक्ष डॉ.सी.डी. महाजन, शाखाध्यक्ष डॉ.प्रसाद सोनार, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, शांतीलाल शिंदे, खंडू घोडे, फिरोज खान, किर्तीवर्धन तायडे, सूर्यकांत आगळे, वसंत वळवी, चंद्रमणी                बरडे, उपक्रम कार्यवाह दिलीप  बैसाणे, व्यंकटेश शर्मा, धनश्री शिंदे, विश्विजत शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.