शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:सह वडील व मुलाला हिंमत देत कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:17 IST

हिरालाल रोकडे। लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : २५ एप्रिल ला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला आणि मन धास्तावले कोरोना ...

हिरालाल रोकडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : २५ एप्रिल ला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला आणि मन धास्तावले कोरोना विषाणू आजाराने आपल्याला ग्रासले असून आता आपले भवितव्य काय याबाबत चिंता वाटली. मात्र स्वत: वैद्यकीय व्यवसायात असल्याने हिंमत न हारता आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. तब्बल २१ दिवस माझ्यासह माझे ६५ वर्षीय वडील व बारा वर्षाच्या मुलीवर जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य उपचार केल्याने आम्ही या जीवघेण्या प्रसंगातून बाहेर निघालो.
गरीब नवाज कॉलनीतील पेशाने डॉक्टर असलेल्या इम्रान पठाण कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. जिल्हा रुग्णालयातून आपण पॉझिटिव्ह असल्याचा दूरध्वनी आल्यानंतर ते धास्तावले त्यानंतर थोड्याच वेळात त्यांना नेण्यासाठी रुग्णवाहिका आली. आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. दुसºया दिवशी वडिल व मुलाचाही रिपोर्ट पॉझीटिव्ह आला.
येथून त्यांची कोरोन विषाणू शी संघर्षाची कहाणी सुरू होते. एकाच वेळी वडील-मुलगी व स्वत: डॉ. पठाण हे तिघं कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या तिघांना जिल्हा रुग्णालयातील विशेष आयसोलेशन कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आले. सुरुवातीचे दोन दिवस मन खूप बेचैन होते. आता आपले काय होणार आपल्या कुटुंबियांचे काय होणार ही चिंता सातत्याने सतावत असल्याने दोन दिवस त्रास झाला. मात्र स्वत: डॉक्टर असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी निर्णय घेतला. जिल्हा रुग्णालयात २५ बाय ५० मीटरच्या हॉलमध्ये डॉ.पठाण यांच्या कुटुंबीयांसह इतर सात कोरोना बाधित रूग्ण उपचारासाठी दाखल होते सतत २१ दिवस या साऱ्यांवर जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी अहोरात्र मेहनत घेत उपचार केला.
उपचार सुरू असतानाच्या दिनचैर्येबाबत डॉ. पठाण यांनी सांगितले, नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी जागतिक आरोग्य संघटना व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आम्हा सर्वांवर रुग्णालयात दाखल झाल्यापासून उपचार सुरू केले. दररोज सकाळी सात वाजता व सायंकाळी पाच वाजता नियमित औषधे देण्यात येत होती. त्याचप्रमाणे सकाळी नऊ वाजता व रात्री आठ वाजता विविध प्रकारची इंजेक्शन दिली जात होती. सकाळी सातला गोळी दिल्यानंतर रुग्णालयातर्फे नाश्ता दिला जात होता. यात चहा, अंडी, दूध, पोहे व ऊपमा यांचा समावेश होता.
दुपारी व रात्री नियमानुसार जेवण दिले जात होते. दिवसभर विटामिन सी यासह मल्टिव्हिटॅमिन यांचे डोसेस सुरू होते. विविध प्रकारच्या गोळ्या दिल्या जात होत्या. पाचव्या दिवसापासून आम्हाला सर्वांना बरे वाटायला लागले व खात्री झाले की या जीवघेना संकटावर आपण मात करू शकतो.
याचदरम्यान दिवसभर रुग्णालयातील कर्मचारी व अधिकारी आमचे मनोबल वाढविण्यासाठी या आजाराशी लढा देण्यासाठी सातत्याने हिम्मत देत होते. स्वत: डॉक्टर असल्याने वैद्यकीय पथकाला सहकार्य करीत माझ्या कुटुंबीयांसह इतर पेशंटची ही मदत सुरू केली. सातत्याने प्रत्येकाला हिम्मत देण्याचे काम केले, प्रत्येकाचे मनोबल वाढविले व प्रत्येक रुग्णाच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. रुग्णालयातील डॉ.राजेश वसावे, डॉ.डी.एच. चौधरी यांच्याशी नित्यनियमाने विविध विषयांवर चर्चा करून औषधोपचार सुरू ठेवला. नर्सेस, सफाई कर्मचारी, जेवणाचा डबा आणून देणारे मेस बॉय यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
या कर्मचाºयांशी एक वेगळा ऋणानुबंध निर्माण झाला व याची परिणीती तब्बल २१ दिवसानंतर माझे स्वत:चे कुटुंबातील व उर्वरित रुग्णांचे २ अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आम्ही कोरोना विषाणू वर मात केली असल्याचे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले आणि या दिव्यातून आपण बाहेर पडल्याची खात्री झाली.


माझे नागरिकांना आवाहन आहे की कोरोना विषाणू हा जीवघेणा आजार आहे. कोणत्याही नागरिकाला सर्दी खोकला ताप अशी लक्षण आढळून आल्यास त्यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा आपल्या फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधावा. आपल्याला असलेला आजार लपवू नये या आजारावर उपचार शक्य आहे. फक्त प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे डॉ.पठाण यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर अत्यंत चांगले उपचार केले जात आहेत. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत नकारात्मक विचार मनात आणू नये. प्रत्येक नागरिकाने आपल्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे.