शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात सर्वच भागात प्रादुर्भाव 11 दिवसात 365 नवे रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यात नंदुरबार आघाडीवर आहे. शहर व तालुक्यात मार्च महिन्यात अर्थात ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यात नंदुरबार आघाडीवर आहे. शहर व तालुक्यात मार्च महिन्यात अर्थात १० दिवसात ३६५ कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्या खालोखाल शहादा शहर व तालुक्यात १५३ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्याचा पॅाझिटिव्हीटी रेट हा १५.७५ इतका आहे. तर दोन दिवसात हाच रेट १७ टक्केपर्यंत गेला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या १५ दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने उपाययोजनांना गती दिली आहे. त्याअंतर्गत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

नंदुरबार ठरू पहातोय हॅाटस्पॅाट

नंदुरबार शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. १ ते ११ मार्च या दरम्यान ३६५ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे वयोगट हा १७ ते ७० असल्याने चिंता वाढली आहे. सद्या शाळा सुरू असल्याने पालक धास्तावले आहेत. शहरातील शासकीय मुलींच्या निवासी शाळेतील ३० मुली कोरोना बाधित आढळून आल्या होत्या. त्यानंतर शहरातील एका नामांकित शाळेतील दोन विद्यार्थिनी आढळल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही कोरोनाच फैलावत असल्याचे चित्र आहे. याच दरम्यान जिल्ह्यातील प्राथमिक शाळा देखील सुरू करण्यात आल्या आहेत. अर्थात प्राथमिक शाळा केवळ ग्रामिण भागातील सुरू आहेत. शहरी भागातील नसल्या तरी ग्रामीण भागात शाळेत जाणारे शिक्षक हे शहरी भागातूनच जात असल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात कोरोना रुग्ण गेल्या तीन महिन्यांपासून आढळून येत नव्हते. मात्र, दोन दिवसांपासून धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात देखील रुग्ण वाढले असल्याचे चित्र आहे.

शहादाही मागे नाही

जिल्ह्यात नंदुरबार व शहादा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास सारखीच आहे. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील जवळपास सारखीच येत आहे. मार्च महिन्यात अर्थात १ ते ११ मार्च दरम्यान तालुक्यात १५३ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या महिन्यात कलमाडीतर्फे बोरद तसेच करणखेडा या गावांना मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले होते.

लग्न समारंभ ठरले कारण

गेल्या महिनाभरात झालेल्या लग्न समारंभांमधील गर्दी कोरोना वाढीस लागण्यास कारणीभूत ठरली आहे. लोकं लग्न व सार्वजनिक समारंभांमध्ये कुठलेही बंधने पाळत नाहीत. मास्कचा वापर नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही, सॅनिटायझरचा उपयोग होत नव्हता. त्यामुळे त्या काळात वाढलेले रुग्ण व त्यांची वाढलेली संपर्क साखळी आता जीवघेणी ठरू लागली आहे.

दुर्गम भागातही...

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या तीन ते चार महिन्यात दुर्गम भागात नव्हता. अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात एकही रुग्ण आढळून येत नव्हता. मात्र गेल्या चार दिवसांपासून या दोन्ही तालुक्यात रुग्ण आढळून येत आहेत. स्थलांतरीत मजूर आता परतू लागले आहेत. त्यामुळे धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहरी भागातून दुर्गम भागात जाणाऱ्या शिक्षकांसह इतर कर्मचारींमुळेही धोका वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नंदुरबारात सर्वच भागात

n नंदुरबारात गेल्या ११ दिवसात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे १० रोजी ७० इतके आढळून आले होते. १ रोजी १२, २ रोजी ४१, ३ रोजी ३५, ४ रोजी २६, ५ रोजी ३०, ६ रोजी १८, ७ रोजी ११, ८ रोजी ४४, ९ रोजी ५८ तर ११ रोजी सायंकाळपर्यंत २० रुग्ण आढळून आले होते. शहरातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने शहरवासी धास्तावले असून चिंतेचे वातावरण पसरले आहे.

शहादा पुन्हा वाढतेय...

n शहादा शहरासह ग्रामिण भागात देखील कोरोनाचा फैलाव कायम आहे. ११ दिवसात आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक २८ रुग्ण ९ मार्च रोजी होते. १ रोजी १२, २ रोजी १३, ३रोजी १६, ४ रोजी सहा, ५ रोजी नऊ, ६ रोजी एकही नाही, ७ रोजी १२, ८ रोजी एक, १० रोजी नऊ तर ११ रोजी सायंकाळपर्यंत ४७ रुग्ण आढळून आले आहेत. कलमाडीतर्फे बोरद आणि करणखेडा ही हॅाटस्पॅाट ठरली.

११ दिवसात आठ मृत्यू : ११ दिवसात आठ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ११दिवसात डेथ रेट हा १.४ टक्के आहे तर जिल्ह्याचा आतापर्यंतचा डेथ रेट हा २.२८ इतका राहिला आहे. १० रोजी एकाच दिवसात तीन जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यूचा वयोगट हा ४५ ते ७० असा आहे. त्यामुळे वयोवृद्ध आणि विविध व्याधीग्रस्तांनी काळजी घेणे गरजेचे आहे.