शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरगावाहून आलेल्यांंची आरोग्य विभागाकडून काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी आरोग्य विभागाने ग्राउंड लेव्हलवर प्रयत्न सुरु केले आहेत़ या प्रयत्नात आता तालुकास्तरावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी आरोग्य विभागाने ग्राउंड लेव्हलवर प्रयत्न सुरु केले आहेत़ या प्रयत्नात आता तालुकास्तरावर बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करुन त्यांच्या तपासण्या सुरु असून सुदैवाने अद्याप एकही संशयित आढळून आलेला नसल्याची माहिती आहे़ या नागरिकांच्या तपासण्या करण्यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे़नंदुरबार तालुक्यात शनिमांडळ, लहान शहादे, कोपर्ली, आष्टे, नटावद, ढेकवद आदी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यांच्या उपकेंद्रांतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावोगावी जनजागृती करुन पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद यासह इतर शहरांमधून आलेल्या नागरिकांची माहिती देण्याचे आवाहन केले होते़ त्यांच्या या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत माहिती देण्यास प्रारंभ केला होता़ यातून आरोग्य विभागाकडे माहिती येण्यासह बरेच जण आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात तपासणी करुन घेण्यासाठी हजर झाले होते़ या सर्वांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून त्यातील एकातही कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नसल्याची माहिती आहे़ यामुळे या नागरिकांना १४ दिवस घरीच राहण्याचे सूचित करण्यात आले असून त्यांची आरोग्य विभागाचे पथक नियमित तपासणी करत आहे़ दर तीन तासाने या नागरिकांची तपासणी होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने त्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्तरावर गरजेचे साधने पुरवली आहेत़ तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक आणि आरोग्यसेविका यांना या ठिकाणी तैनात करण्यात आले आह़े़ दर तीन तासांनी होणाºया तपासणीतून किरकोळ आजारही समोर आलेले नसल्याची माहिती असून पुढे १४ दिवस ही प्रक्रिया नियमित सुरु राहणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ जी़डी़ तडवी यांनी दिली आहे़१ हजार ४४४ नागरीकांची नोंदणीनंदुरबार तालुक्यातील चार प्राथमिक केंद्र स्तरावर बाहेरगावाहून आलेल्या १ हजार ४४४ नागरिकांची नोंद करण्यात आली आहे़ येथील मूळ रहिवासी असलेल्या परंतू नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या या नागरिकांनी सध्या गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे़ यातून मग ते गावी परतल्यानंतर स्वत: येऊन तपासणी करुन घेत आहेत़ सध्या नंदुरबार तालुक्याच्या विविध गावांमध्ये पुणे, मुंबई तसेच गुजरात राज्याच्या विविध भागातून नागरिक येत असल्याने त्यांना त्यांचे कुटूंबिय आधी आरोग्य केंद्रात जाऊन येण्याच्या सूचना करत आहेत़ यानुसार तपासण्या सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे़