अन्यथा कठोर निर्बंधांची तयारी ठेवा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 14:45 IST2021-03-19T14:25:39+5:302021-03-19T14:45:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या वर्षापेक्षा अधिक रुग्ण संख्या सध्या समोर येत आहे. परंतू  आज आपल्याकडे लस उपलब्ध ...

Otherwise, be prepared for drastic restrictions - Chief Minister Uddhav Thackeray | अन्यथा कठोर निर्बंधांची तयारी ठेवा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अन्यथा कठोर निर्बंधांची तयारी ठेवा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या वर्षापेक्षा अधिक रुग्ण संख्या सध्या समोर येत आहे. परंतू  आज आपल्याकडे लस उपलब्ध आहे. नागरीकांनी नियमांचे पालन केले पाहिजे, जर तसे होत नसेल तर येत्या काळात कठोर उपाययोजना कराव्या लागतील असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. शुक्रवारी जिल्हा दाै-यावर आलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 
नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी आले होते. यावेळी त्यांनी मोलगी ता. अक्कलकुवा येथील पोषण पुनवर्सन केंद्र व लसीकरणाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी सुरवाणी ता. धडगाव येथील महाट्रान्सकोच्या वीज उपकेंद्राची पाहणी करुन ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ज्याप्रमाणे कोरोना रुग्ण संख्या वाढली होती. तशीच रुग्णसंख्या आताही वाढली आहे. परंतू आपल्याकडे आज ढाल म्हणून लस उपलब्ध आहे. नागरीकांनी ती लस घेतली पाहिजे. लसीकरण करत असताना दुसरीकडे नियमांचे पालन केले पाहिजे. जेणेकरुन संसर्ग होणार नाही. परंतू जर नियमांचे पालन होत नसेल तर येत्या काळात कठोर उपाययाेजना केल्या जातील.
दरम्यान तोरणमाळ येथील पर्यटन विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तोरणमाळचा विकास करण्यासाठी प्रशासनाने पाच वर्षाचा आराखडा पाठवून द्यावा आपण लगेच त्याला मंजूरी देवू, सोबतच तोरणमाळ येथे महाट्रान्स्कोचे १६ कोटी रूपयांचे उपकेंद्र बांधण्याचा प्रस्तावही देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सागितले. 
येत्या काळात तोरणमाळ येथे भेट देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. 

Web Title: Otherwise, be prepared for drastic restrictions - Chief Minister Uddhav Thackeray