फेस येथील आरोग्य उपकेंद्रातील निधी खर्चाच्या चाैकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:13+5:302021-06-22T04:21:13+5:30

उपकेंद्रांसाठी आलेला निधी खर्च केल्याबाबतची माहिती फेस येथील राहुल कोळी यांनी मागितली होती. त्या अनुषंगाने तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी ...

Order of check of funds expenditure in the health sub-center at Face | फेस येथील आरोग्य उपकेंद्रातील निधी खर्चाच्या चाैकशीचे आदेश

फेस येथील आरोग्य उपकेंद्रातील निधी खर्चाच्या चाैकशीचे आदेश

उपकेंद्रांसाठी आलेला निधी खर्च केल्याबाबतची माहिती फेस येथील राहुल कोळी यांनी मागितली होती. त्या अनुषंगाने तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी वडाळी आरोग्य केंद्राला आदेश देत माहिती देण्याचे सांगितले होते. त्यानुसार ही माहिती दिल्यानंतर फेस उपकेंद्राच्या आरोग्यसेविकेने खर्च केलेला बराच निधी हा संबंधित विक्रेता यांना त्यांच्या नावाने शासन नियमानुसार सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीव्दारे न देता स्वत:च्या नावाने बँकेतून रक्कम काढल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. बोगस बनावटी बिले बनवून शासनाच्या निधी हडप केल्याचे स्पष्ट दिसून येत होते. याअंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे ऑनलाईन तक्रार केली गेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. बोडके यांनी शहादा तालुका वैद्यकीय अधिकारी यांना सखोल चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Order of check of funds expenditure in the health sub-center at Face