शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

संपर्क साखळी तोडण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील 15 व्यक्तींची चाचणी झालीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:10 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  कोविड-१९ संसर्गामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी. बाधिताच्या संर्कातील किमान १५ जणांची ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  कोविड-१९ संसर्गामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी. बाधिताच्या संर्कातील किमान १५ जणांची कोविड चाचणी करावी. कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करावे, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र  भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, आदी उपस्थित होते.गमे  म्हणाले, कोरोनाबाधितांच्या मृत्यूमागील कारणाच्या विश्लेषणाच्या आधारे सर्वेक्षणातील त्रृटी दूर    करण्याचा प्रयत्न करावा. त्यासोबत संपर्क साखळी तोडण्यासाठी प्रत्येक कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील किमान १५ व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात यावी. मृत्यूदर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे         असे त्यांनी सांगितले. जिल्हा    प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी चांगल्या उपाययोजना केल्याचे ते म्हणाले.जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी कोरोनाबाबत उपाययोजनांची माहिती दिली. कोरोना लसीकरणाबाबत आवश्यक नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तळोदा येथे ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.महसूल कामाचा आढावा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्ह्यातील महसूल कामकाजाचा आढावा घेवून कामाबाबत समाधान व्यक्त केले.  ते म्हणाले, जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कामकाजाचे चांगले नियोजन करण्यात आले आहे.  अधिकाऱ्यांनी  प्रलंबित बाबी त्वरीत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे.  जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयाने शेतकऱ्यांना मोजणी नकाशे वेळेवर द्यावे.  महसूल उत्पन्नात वाढ आणि वाळू घाटांच्या लिलावावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले.  उभारी कार्यक्रमामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार मिळेल असे सांगून शासनाच्या विविध योजनांचा लाभही अशा कुटुंबांना देण्याची सूचना त्यांनी केली.

वसुंधरा अभियानातील मुल्यांकन वाढवावेविभागीय आयुक्तांनी वसुंधरा अभियानाचा आढावा घेतला.  ते म्हणाले, डिसेंबर अखेरपर्यंत मुल्यांकन वाढविण्याचा प्रयत्न करावा. वृक्ष लागवडीवर भर देऊन पाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात यावी.  वायु संवर्धनासाठी सीएसआर अंतर्गत निधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. लोणखेडा आणि प्रकाशा येथे उद्यान निर्मितीसाठी स्थानिकांना प्रोत्साहित करावे. नगरपालिका क्षेत्रात होणाऱ्या कामाची तपासणी करुन     आढळणाऱ्या त्रृटीचे विश्लेषण करावे व त्याआधारे आवश्यक सुधारणा कराव्यात. अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले.

गेल्या बैठकीतील सुचनांचा घेतला आढावा... विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे यांनी पदभार स्विकारल्यानंतर नंदुरबारचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी आढावा बैठकीत केेलेल्या सुचनांची किती व कशी अंमलबजावणी झाली याची माहिती घेतली.गेल्या वेळी त्यांनी थेट कोरोना उपचार कक्षामध्ये जाऊन तेथील पहाणी केली होती. आता देखील कोरोना संदर्भात त्यांनी विविध सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय राजस्व अभियानाच्या अंमलबजावणीची देखील त्यांनी माहिती घेतली.