कापूस खरेदीवर ओपन मार्केटचा वार; तरीही सीसीआय दोन लाखांच्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:29 AM2021-01-22T04:29:12+5:302021-01-22T04:29:12+5:30

२०१९ च्या खरीप हंगामातील कापूस खरेदी जून २०२० पर्यंत सुरू होती. यातून शेतकऱ्यांनी गेल्या खरीप हंगामातही पुन्हा कापसावर भिस्त ...

Open market attack on cotton purchases; Still CCI crosses two lakhs | कापूस खरेदीवर ओपन मार्केटचा वार; तरीही सीसीआय दोन लाखांच्या पार

कापूस खरेदीवर ओपन मार्केटचा वार; तरीही सीसीआय दोन लाखांच्या पार

Next

२०१९ च्या खरीप हंगामातील कापूस खरेदी जून २०२० पर्यंत सुरू होती. यातून शेतकऱ्यांनी गेल्या खरीप हंगामातही पुन्हा कापसावर भिस्त ठेवत १ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड केली होती. यातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन येणार अशी शक्यता असताना कापसावर लाल्याचे आक्रमण झाले होते. यातून सावरत शेतकऱ्यांनी हाती असलेला कापूस वेचणी करत सीसीआयकडे नोंदणी केली होती. नंदुरबार तालुक्यात साधारण साडेसात हजार तर शहादा तालुक्यात साडेआठ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करून कापूस विक्री केली होती. नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या या खरेदीला वेळोवेळी ब्रेक लागूनही जानेवारीच्या मध्यातच शहादा आणि नंदुरबार केंद्रांनी अडीच लाख क्विंटल कापूस खरेदी पूर्ण केली आहे.

दरम्यान, खासगी व्यापारी सीसीआय देत असलेल्या ५ हजार ७०० ते ५ हजार ८०० रुपयांपर्यंतचे दर देत असतानाही गेल्या काही वर्षांत खेडा खरेदीत झालेल्या फसवणुकीमुळे शेतकरी सीसीआयकडेच कापूस देत आहेत. यातून केवळ अडीच महिन्यांच्या काळात ही खरेदी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

नंदुरबार येथील केंद्रावर गेल्या दोन दिवसांपूर्वीच एक क्विंटल कापूस खरेदीचा टप्पा पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस विक्री झाल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याने शेतकरी या ठिकाणी धाव घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. शहादा तालुक्यात मात्र याउलट स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना संपर्क करत खेडा खरेदी करणारे थेट घरापर्यंत जाऊन मालाची उचल करू लागल्याने शहादा तालुक्यातील कापूस खरेदीचा हंगाम आवरता झाल्याचे बोलले जात आहे. यातच खेतिया बाजारातही कापसाचे दर वाढले असल्याने शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तिकडची वाट धरली आहे.

नंदुरबार एक लाख पार

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळाशी येथील खरेदी केंद्रात एक लाख २०० क्विंटल कापूस आवक आजअखेरीस झाली आहे.

या केंद्रात ५ हजार ८६० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केला गेला.

नंदुरबारसह धुळे जिल्ह्यातून येथे कापसाची आवक झाली होती.

शहाद्यात आवक थंड

शहादा बाजार समिती सीसीआयचे केंद्र चालवते. या ठिकाणी आतापर्यंत १ लाख ५८ हजार क्विंटल कापूस आवक झाली आहे.

परंतु, तूर्तास आवक थांबल्याची माहिती देण्यात आली आहे. तालुक्यात खासगी व्यापारी ५ हजार ७०० रुपयांपर्यंत दर देत असल्याने ही स्थिती आहे.

Web Title: Open market attack on cotton purchases; Still CCI crosses two lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.